Homeकल्चर +27 ते 31...

27 ते 31 जानेवारीदरम्यान मुंबईत एससीओ चित्रपट महोत्सव

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय येत्या 27 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत मुंबईत एससीओ (शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन) म्हणजेच शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाचं, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या माध्यमातून आयोजन करत आहे. एससीओचं भारताकडे असलेलं अध्यक्षपद सूचित करण्यासाठी, या एससीओ चित्रपट महोत्सवाचं आयोजन केलं जात आहे.

महोत्सवाविषयी प्रसारमाध्यमांना माहिती देताना, अतिरिक्त सचिव, नीरजा शेखर म्हणाल्या की, या महोत्सवाचं उद्दिष्ट, एससीओमधील विविध देशांमध्ये चित्रपटविषयक भागीदारी निर्माण करणं आणि या देशांच्या संस्कृतींना जोडणारा सेतू म्हणून काम करणं, हा आहे. यामुळे, एकमेकांच्या चित्रपटविषयक अनुभवांच्या माध्यमातून एससीओ सदस्य राष्ट्रांमधील चित्रपट व्यावसायिकांमध्ये समन्वय निर्माण होईल. एससीओ चित्रपट महोत्सवात दाखवल्या जाणाऱ्या सदस्य राष्ट्रांमधील चित्रपटांमधून, प्रेक्षकांना विविध संस्कृतींचा अनुभव घेता येईल आणि एससीओ देशांतील लोकांना एकमेकांना अधिक चांगल्याप्रकारे जाणून घेण्यासाठी हे चित्रपट म्हणजे एक सामाईक चौकट ठरेल, असही त्यांनी पुढे सांगितलं.

या महोत्सवात एससीओ देशांचे चित्रपट, स्पर्धा आणि स्पर्धेतर अशा दोन विभागांमध्ये दाखवले जातील, अशी माहितीही शेखर यांनी दिली. चित्रपटांव्यतिरिक्त, महोत्सवात मास्टर-क्लास (मार्गदर्शन सत्र), संभाषण सत्र, सदस्य देश आणि भारत यांच्याशी निगडित दालनं, छायाचित्र आणि पोस्टर (जाहिरात पत्र) प्रदर्शन, हस्तकला स्टॉल आणि इतर अनेक कार्यक्रम असतील. एससीओ चित्रपट महोत्सवाचं आयोजन, SCOच्या भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात केलं जात असल्यानं, या महोत्सवाची सुरुवात भारतीय चित्रपटाच्या जागतिक प्रीमियरनं (पहिलं सार्वजनिक प्रदर्शन) होईल.

उद्घाटन समारंभ 27 जानेवारी 2023 रोजी, मुंबईत NCPA (नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स अर्थात राष्ट्रीय कलाविष्कार केंद्र)च्या जमशेद भाभा प्रेक्षागृहात होणार आहे. चित्रपट महोत्सवातील चित्रपटांचे खेळ, मुंबईत दोन ठिकाणी होतील. पेडर रोड येथील फिल्म्स डिव्हिजन संकुलातील 4 प्रेक्षागारं आणि वरळीच्या नेहरू तारांगण इमारतीमधील राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ NFDC (National films development corporation)चं एक प्रेक्षागृह, अशी ही दोन ठिकाणं आहेत.

स्पर्धा विभाग हा फक्त एससीओ सदस्य राष्ट्रांसाठी आहे आणि त्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (चित्रपट), स्पेशल ज्युरी अवॉर्ड (विशेष परीक्षक पुरस्कार) अशा विविध प्रतिष्ठित पुरस्कारांचा समावेश आहे. स्पर्धेतर विभाग सर्व एससीओ देशांसाठी, म्हणजे संघटनेचे सदस्य देश, निरीक्षक देश आणि सदस्य देशांशी संवाद साधणारे भागीदार देश यांच्यासाठी, खालील श्रेणींमध्ये आहे.

एससीओ फोकस फिल्म्स म्हणजे एससीओ देशांशी मुख्यत्वाने संबंधित असलेले चित्रपट, या चित्रपट महोत्सवात संबंधित एससीओ देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले गेले आहेत. अशाप्रकारे, विविध देशांमधील देवाणघेवाण प्रबळ करता येते आणि सदस्य देशांमधील सांस्कृतिक बंध दृढ करता येतात. एससीओ देशांच्या प्रसिद्ध दिग्दर्शकांनी बनवलेले दिग्दर्शककेंद्रीत चित्रपट (डायरेक्टर फोकस फिल्म), देशाच्या वारशात योगदान देणारे, आपलं कसब आणि चित्रपटाची जातकुळी उत्तम जाणण्याबद्दल, देशात ख्यातनाम असलेले दिग्गज दिग्दर्शक, अशा दिग्दर्शकांनी बनवलेले चित्रपट, लहान मुलांसाठी तयार केलेल्या चित्रपटांमुळे मुलांना ज्ञान मिळते आणि त्यांचे मनोरंजन होते त्याचसोबत हे चित्रपट आकलन सुलभ असतात. अशाप्रकारे लहान मुलांमध्ये आवड निर्माण होऊन त्यांच्या मनावर संस्कार होतात.

20 मिनिटांपेक्षा जास्त कालावधी नसलेले कलात्मक आणि सिनेमॅटिकदृष्ट्या दर्जेदार लघु चित्रपट आपल्या मूळ ताज्या संकल्पनेद्व्वारे प्रेक्षकांच्या कल्पनेचा वेध घेतात. भारतीय पुनर्संचयित उत्कृष्ट – 5 चित्रपट प्रदर्शित होत आहेत. एससीओ चित्रपट महोत्सवात एससीओ देशांमधून एकूण 57 चित्रपट प्रदर्शित केले जातील. स्पर्धा विभागात 14 वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट आहेत आणि ते प्रदर्शित केले जातील तर स्पर्धेतर विभागात 43 चित्रपट प्रदर्शित केले जातील.

स्पर्धा विभागासाठी एकूण 14 चित्रपटांना नामांकन देण्यात आले आहे. निखिल महाजन दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘गोदावरी’ आणि पान नलिन दिग्दर्शित गुजराती चित्रपट ‘द लास्ट फिल्म शो’ यांना भारताच्या सदस्य राज्यातून नामांकन मिळाले आहे. ए. झैरोव दिग्दर्शित रशियन चित्रपट “मॉम, आय एम अलाईव्ह !”, एम मामीरबेकोव्ह आणि बैराकिमोव्ह अल्दियार दिग्दर्शित पॅरालिम्पियन हे चित्रपट कझाकस्तानच्या सदस्य राज्यातून नामांकित आहेत. बाकित मुकुल, दास्तान झापर उलू आणि उई सत्यलाट यांनी दिग्दर्शित केलेला अकिर्की कोच (द रोड टू ईडन) आणि तालाईबेक कुलमेंदीव दिग्दर्शित (होम फॉर सेल) या किर्गिझ चित्रपटांना किर्गिस्तानच्या सदस्य राज्यातून नामांकन मिळाले आहे. यिहुई शाओ यांनी दिग्दर्शित केलेला इटालियन आणि चिनी चित्रपट बी फॉर बिझी आणि शिओझी राव दिग्दर्शित होम कमिंग हे चीनी चित्रपट चीनच्या सदस्य राज्यातून नामांकित आहेत.

लिउबोव्ह बोरिसोवा सखा दिग्दर्शित रशियन चित्रपट डोन्ट बरी मी विदाऊट इव्हान आणि एव्हगेनी ग्रिगोरेव्ह दिग्दर्शित पोडेलनिकी (द रॉयट) या रशियन चित्रपटांना रशियाच्या सदस्य राज्याने नामांकन दिले आहे. डी. मासायदोव्ह आणि मेरास यांनी दिग्दर्शित केलेला एएल किस्मती  (द फेट ऑफ अ वूमन) आणि हिलोल नसिमोव दिग्दर्शित (लीगसी) या उझबेक चित्रपटांना उझबेकिस्तानच्या सदस्य राज्यातून नामांकन मिळाले आहे. मुहिद्दीन मुझफ्फर आणि ओखिरिन सयदी सयोद दिग्दर्शित ताजिक चित्रपट डोव (फॉर्च्युन) आणि महमद्राबी इस्मोइलोव्ह दिग्दर्शित (हंटर्स फायनल प्ले) यांना ताजिकस्तानच्या सदस्य राज्यातून नामांकन मिळाले आहे.

SCO चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपट

निखिल महाजन दिग्दर्शित सर्वाधिक प्रशंसित मराठी चित्रपट गोदावरी आणि सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा श्रेणीतील ऑस्करसाठी भारताचा अधिकृत प्रवेश मिळालेला लास्ट फिल्म शो म्हणून ओळखला जाणारा गुजराती चित्रपट छेल्लो शो स्पर्धा विभागात दाखवला जाईल. यासोबतच शूजित सरकारचा सरदार उधम, एस. एस. राजामौलीचा कालातीत चित्रपट आरआरआर, एससीओ चित्रपट महोत्सवात सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. डायरेक्टर फोकसमधील संजय लीला भन्साळी यांचा गंगूबाई काठियावाडी, चिल्ड्रन फोकसमधील मृदुल टूल्सीदासचा टूलसीदास ज्युनिअर आणि चेतन भाकुनी यांचा जुगलबंदी हा लघुपट दाखवण्यात येणार आहे. शिवाय पाच पुनर्संचयित क्लासिक चित्रपट देखील महोत्सवात प्रदर्शित केले जातील. शतरंज के खिलाडी; (1977, हिंदी), सुबर्णरेखा (1965, बंगाली), चंद्रलेखा (1948, तमिळ), इरु कोडगुल (1969, तमिळ) आणि चिदंबरम (1985, मल्याळम) यांचा त्यात समावेश आहे.

एससीओची अधिकृत भाषा म्हणजे रशियन आणि चिनी या चित्रपट महोत्सवाची अधिकृत भाषा असेल. भारतात या महोत्सवाचे आयोजन केले जात असल्याने इंग्रजीचाही कार्यात्मक भाषा म्हणून समावेश केला जाईल. ज्युरी आणि स्थानिक प्रेक्षकांसाठी प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांना इंग्रजीत डब किंवा सबटायटल्स करणे आवश्यक आहे.

भारतीय चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांसह या महोत्सवात सहभागी होणारे शांघाय सहकार्य संघटनेच्या देशातील नामवंत चित्रपट निर्माते आणि कलाकारांसह तज्ज्ञांचे मार्गदर्शन (‘मास्टरक्लासेस’) आणि संवादात्मक (‘इन कॉन्व्हर्सेशन’) सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. अॅनिमेशनच्या इतिहासाचा मागोवा घेणारे आणि अॅनिमेशन तसेच दृश्य परिणामांच्या (व्हिज्युअल इफेक्ट्सच्या) मदतीने ‘दृश्यचित्र तयार करण्याच्या’ अमर्याद संधींचे सादरीकरण करणाऱ्या सत्रांचे आयोजन उद्योग तज्ञांसोबत करण्यात आले आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चित्रपट वितरण आणि चित्रपटाच्या भाषेच्या अनुवादांचे परिदृश्य बदलण्यासंदर्भातही काही सत्रे ठेवण्यात आली आहेत.

ऑनलाइन प्रतिनिधी नोंदणी,  https://sco.nfdcindia.com/  या शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सव पोर्टलवर करता येईल तसेच मुंबईतील पेडर रोड येथील चित्रपट प्रभागाच्या (फिल्म्स डिव्हिजन) संकुलात मुख्य महोत्सवाच्या ठिकाणी प्रत्यक्ष नोंदणी कक्ष उपलब्ध असतील. या महोत्सवासाठी प्रतिनिधी नोंदणी शुल्क रु. 300 किंवा रु.100 प्रतिदिन ठेवण्यात आले आहे. ही नोंदणी विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य ठेवण्यात आली आहे.

शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सव 2023साठी ज्युरींमध्ये पुढील परीक्षकांचा समावेश आहे. भारत- राहुल रवैल, चीन- निंग यिंग, कझाकिस्तान- दिमाश कुडैबर्गेन, किर्गिझस्तान- गुलबरा तोलोमुशोवा, रशिया- इव्हान कुद्रियावत्सेव, ताजिकिस्तान- मेहमेदसैद शोहियोन, उझबेकिस्तान- मत्याकुब सादुल्लायेविच मॅकनोव्ह.

शांघाय सहकार्य संघटना ही बहुपक्षीय संघटना 15 जून 2001 रोजी स्थापन झाली. या संघटनेत सध्या आठ सदस्य देश (चीन, भारत, कझाकस्तान, किर्गिजस्तान, रशिया, पाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान), तीन निरीक्षक देश (बेलारूस, इराण आणि मंगोलिया) आणि चौदा संवाद भागीदार (आर्मेनिया, अझरबैजान, कंबोडिया, नेपाळ, श्रीलंका, इजिप्त, सौदी अरेबिया, कतार, बहरीन, कुवेत, मालदीव, म्यानमार, यूएई आणि तुर्की) यांचा समावेश आहे.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content