Homeमुंबई स्पेशलअँम्ब्रोशिया गार्डनमध्ये आज...

अँम्ब्रोशिया गार्डनमध्ये आज आनंद लुटा संगीत महोत्सवाचा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एस विभागातर्फे पवई येथील ‘पंडित दिन दयाल उपाध्याय उद्यान तथा अँम्ब्रोशिया गार्डन’ येथे आज आणि उद्या म्हणजेच दिनांक 24 व 25 फेब्रुवारी 2024 रोजी ‘नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ यांच्यामार्फत ‘एनसीपीए ॲट द पार्क’ हा संगीत महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. संध्याकाळी सहा वाजता होणारा हा कार्यक्रम सर्वांनाच मोफत उपलब्ध आहे. “बुक माय शो” येथे याकरीता नोंदणी उपलब्ध आहे.

कार्यक्रमासाठी मोफत पार्किंग उपलब्ध आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या उद्यान विभागामार्फत त्यांच्या अखत्यारित असलेल्या भूखंडांमध्ये नेहमीच वेगवेगळे स्तुत्य उपक्रम  राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून व नागरिकांचा उद्यानातील वावर वाढवा व नवोदित कलाकारांना एक हक्काचा मंच मिळावा यासाठी निसर्गाच्या सानिध्यात संध्याकाळी 6 वाजता हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे, अशी माहिती उद्यान विभागाचे प्रमुख, उद्यान अधीक्षक जितेन्द्र परदेशी यांनी दिली.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content