मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, ५ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता संस्थेच्या सभागारात संगीत दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पं. मिलिंद रायकर यांनी दिग्दर्शन केलेला `मेलांज’ कार्यक्रम सादर केला जाईल. यात रायकर अकॅडमी ऑफ व्हायोलिनचे विद्यार्थी आणि बॉम्बे स्ट्रिंग्स सहभागी होतील. दिलीप मेजारी व अनुज दणाईत (गिटार), सोहम पराळे (तबला), रितिकेश दळवी (पखवाज), चेतन परब (पर्क्युशन) यांचे सादरीकरण केले जाईल.
संगीत संयोजन डेव्हिड प्रिन्स यांचे असून सूत्रसंचालन रिशा दत्ता यांचे असेल. संगीत संयोजनात रॉकी, डेनिस फर्नांडिस, एलेक्स स्टेल्स यांनीही सहकार्य केले आहे. पाहुणे कलाकार म्हणून आनंद रायकर (अकॉर्डिन), यज्ञेश रायकर (व्हायोलिन) यांचे सादरीकरण रसिकांना अनुभवता येणार आहे. अनिकेत श्रीखंडे मेमोरियल ट्रस्टच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे करण्यात आले आहे. जास्तीतजास्त रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

