Homeकल्चर +येत्या रविवारी आनंद...

येत्या रविवारी आनंद घ्या डॉ. मीता पंडित यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत येत्या  रविवारी, २० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता डॉ. मीता पंडित यांच्या शास्त्रीय संगीत गायनाचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात आलेला आहे.

हा कार्यक्रम संगीताचार्य पं. विष्णु दिगंबर पलुस्कर आणि त्यांचे थोर सुपुत्र पं. द. वि. तथा बापुराव पलुस्कर यांच्या स्मरणार्थ आयोजित केला असून मंजिरी देव, अंजली केळकर व ज्योती वडगामा आणि मोहन व. राजोपाध्ये यांनी सहप्रायोजित केला आहे. कार्यक्रमात यावेळी तबल्याची साथ मंदार पुराणिक, संवादिनीची साथ निरंजन लेले आणि सारंगीवरील साथ फारूख लतीफ करणार आहेत.

डॉ. मीता पंडित या ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका असून त्यांनी संगीताचं शिक्षण त्यांचे आजोबा पद्मभूषण गानमहर्षी पं. कृष्णराव शंकर पंडित आणि त्यांच्या पश्चात वडील पं. लक्ष्मणराव पंडित यांच्याकडे घेतले. त्यांनी शास्त्रीय संगीत ख्याल गायनाच्या बरोबरीने ठुमरी, टप्पा गझल इत्यादी उपशास्त्रीय गायन प्रकारांवर प्रभुत्व मिळवले आहे. त्या आकाशवाणीच्या ग्रेडेड कलाकार असून भारतातील आणि परदेशांतील अनेक संमेलनात त्यांचा सहभाग राहिला आहे. गायन कलेतील प्राविण्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. नुकत्याच त्या माया सोमय्या स्कूल ऑफ म्युझिक आणि परफॉर्मिंग आर्टस्, सोमय्या विद्याविहार विद्यापीठ, येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून विद्यादानाच्या पवित्र कार्यात सक्रिय आहेत.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content