Homeकल्चर +बिग बॉसमध्ये आज...

बिग बॉसमध्ये आज ‘खुल जा सिमसिम’!

बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या “हल्ला बोल” टास्कला काल पूर्णविराम लागला. टीम ए आणि टीम बीमधून टीम एचा विजय झाला. मोटरबाईकवर जय आणि गायत्री बसले होते. कार्याचा संचालक उत्कर्ष बायस्ड खेळला असं मत टीम बीमधल्या सदस्यांनी मांडलं आणि त्याच्या निर्णयाचा निषेध केला.

टीम ए या कार्यामध्ये विजयी ठरली आणि यामधूनच कॅप्टन्सी कार्यासाठी दोन उमेदवार निवडण्याचा आदेश बिग बॉसने विजेत्या टीमला दिला. विचारविनिमयानंतर जय आणि गायत्री ही दोन नावं पुढे आली.

आज या दोघांमध्ये रंगणार आहे “खुलजा सिमसिम” हे कॅप्टन्सी कार्य. कॅप्टन्सी पदासाठी स्पर्धक पुन्हा एकदा एकमेकांविरुद्ध भिडताना दिसणार आहेत. तेव्हा बघुया कोण या कार्यात जिंकणार? कोणाला मिळणार कॅप्टन होण्याचा बहुमान?

बिग बॉसच्या घरात कधी कोणत्या सदस्याला कोणाची गरज लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला खूप विचार करून बोलणं, वागणं अतिशय महत्त्वाचे असते. या घरात सगळंच अनिश्चित आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचंच उदाहरण म्हणजे आज विकाससोबत गायत्री चर्चा करताना दिसणार आहे.

हल्लाबोल या टास्कमध्ये जे घडलं ते आपण पहिलंच. गायत्री विकासला सांगणार आहे, “जर मी कॅप्टन बनले तर जयपेक्षा जास्त निष्पक्ष राहू शकते. जयपेक्षा जास्त शांतता मी ठेऊ शकते. टास्कच्या वेळचा आरडाओरडा आणि मारामारी होणार नाही आणि फेअर प्ले मी करू शकते असं मला वाटतं.

जर तू मला पाठिंबा दिलास, तर मला वाटतं.. ही आपल्यासाठी नवीन सुरुवात असेल. जे काही घडलं त्यानंतर ही एक चांगली सुरुवात असेल. माझ्या डोक्यात काही नाही, तुझ्या डोक्यात काही नाही.

विकास तिला सांगताना दिसणार आहे, “जर अशी कुठली वेळ आली आणि मला तुझी गरज लागली एज अ कॅप्टन तू मला साथ देशील का?

गायत्री त्याला सांगणार आहे, माझ्याकडे असं कोणीच अजून तरी मागितलेलं नाहीये. तेव्हा मी नक्की प्रयत्न करेन तसं करण्याचा”.

बिग बॉसचा कार्यक्रम आणि त्यामधले वेगवेगळे टास्क यांची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगत आहे. “खुलजा सिमसिम” या टास्कसाठीदेखील सदस्य तितक्याच मेहनतीने लढत देणार यात काहीच शंका नाही.

हिंदीमध्ये म्हण आहे ना, “अब आया ऊँट पहाड़ के नीचे” तशी गत होणार आहे. हल्लाबोल, या टास्कसाठी दोन्ही टीममधल्या सदस्यांनी एकमेकांना खडेबोल सुनावले. जय आणि गायत्रीने टीम बीमधून आलेल्या दोन्ही जोड्यांना मोटार बाईकवरून उठवण्यासाठी बरीच मेहनत घेतली, खूप काही ऐकवले. आज जय आणि गायत्रीला कॅप्टन बनण्यासाठी याच सदस्यांच्या पाठिंब्याची गरज लागणार आहे. तो पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांना घरातील सदस्यांना पटवून द्यायचे आहे की, ते उत्तम कॅप्टन कसे आहेत आणि इतर सदस्यांनी त्यांना त्यांचे मत का द्यावं.

अत्यंत कठीण दिसणारा हा टास्क हे सदस्य कसा पार पाडतील? कोण बनेल घराचा नवा कॅप्टन हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. 

जय आज सुरेखाताईंना मनवताना दिसणार आहे. जय हा ताई, ताई.. करत त्यांना विनंती करताना दिसणार आहे. त्यावर सुरेखाताई म्हणतात, “अच्छा ताई? मध्ये काय काय झालं आहे माहिती आहे ना? मला विचार करू दे..

पहिली दुश्मन आहे. मला सॉरी म्हणून माझ्या अंगावर कचरा टाकणारी.

गायत्री त्यावर म्हणते, बघ ना ताई, मी किती गोड आहे.. जय पण संधी साधतो. बघा मी कचरा नाही टाकला. त्यावर सुरेखाताई म्हणतात, तू जे टाकलं आहेस ना ते मला पुढचे चार दिवस आठवत आहे. मी विचार करते थोडा..

ते तुमच्यात काय करतात ना “डील”.. काय असेल डील? मला आवडलं हे खूप डील.. तू जर जिंकलास तर तुझे अर्धे पैसे मला देशील. बघूया सुरेखाताईंचे मत कोणाला मिळणार?

आज रात्री बिग बॉस मराठी, कलर्स मराठीवर..

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content