Homeमुंबई स्पेशलउद्या गुढीपाडव्याचा आनंद...

उद्या गुढीपाडव्याचा आनंद लुटा भायखळ्यातल्या राणीच्या बागेत!

मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवासुविधा देणारी आपली मुंबई महापालिका मुंबईकरांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी विरंगुळ्याची ठिकाणेही उपलब्ध करुन देत असते. या विरंगुळ्याच्या ठिकाणांपैकी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण म्हणजे भायखळा पूर्व परिसरातील राणीची बाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय! या उद्यान व प्राणिसंग्रहालयाची साप्ताहिक सुट्टी दर बुधवारी असते. मात्र, यापूर्वी पालिकेने मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्या बुधवारी हे उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले असते. त्यानुसार उद्या, बुधवारी म्हणजेच दि. २२ मार्च २०२३ रोजी गुढीपाडव्यानिमित्त सुट्टीच्या दिवशीही हे उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेच्या सुविधेकरिता खुले राहणार आहे.

बुधवारी हे उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेकरिता खुले असल्यामुळे त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी ते बंद ठेवण्यात येते. यानुसार हे प्राणिसंग्रहालय गुरुवार, दिनांक २३ मार्च, २०२३ रोजी जनतेकरिता बंद राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने कळविले आहे. हे उद्यान साप्ताहिक सुट्टीचा दिवस वगळता आठवड्यातील इतर सर्व दिवशी नागरिकांसाठी खुले असते. त्यादिवशी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.०० या दरम्यान उद्यानाची तिकीट खिडकी सुरू असते. उद्यान सायंकाळी ६.०० वाजता बंद होते.

या उद्यानात प्रवेशासाठी प्रती व्यक्ती रुपये ५०/- इतके शुल्क असून वयवर्ष ३ ते १५ या वयोगटातील मुलांसाठी रुपये २५/- इतके प्रवेश शुल्क आकारण्यात येते. विशेष म्हणजे आई-वडिल आणि १५ वर्षे वयापर्यंतची २ मुले अशा ४ व्यक्तिंच्या कुटुंबासाठी रुपये १००/- इतके एकत्रित शुल्क आकारण्यात येते.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content