मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर साथ देतील.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. अधिकाधिक रसिकांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- ७७००९९४४९५, २४३०४१५०
