Homeकल्चर +रविवारी आनंद घ्या...

रविवारी आनंद घ्या धनश्री घैसास यांच्या शास्त्रीय संगीताचा!

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे येत्या रविवारी, ४ जून रोजी सायंकाळी पाच वाजता धनाश्री घैसास यांच्या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. त्यांना तनय रेगे तबल्याची तर ज्ञानेश्वर सोनवणे संवादिनीची साथ करतील. हा कार्यक्रम कुणाल भावे यांनी प्रायोजित केला असून रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे.

घैसास

धनाश्री घैसास यांनी संगीताचं प्राथमिक शिक्षण कुमुदिनी काटदरे यांच्याकडे घेतल्यानंतर डॅा. अश्विनी भिडे-देशपांडे यांच्याकडे तालीम घेतली. त्यांना शास्त्रीय संगीताबरोबरच उपशास्त्रीय संगीत शिक्षणासाठी भारत सरकारतर्फे शिष्यवृत्ती मिळाली होती. आकाशवाणीच्याही त्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत. सवाई गंधर्व महोत्सव (पुणे), गणसरस्वती महोत्सव (पुणे), पं. मल्लिकार्जुन मंसूर महोत्सव (धारवाड), एनसीपीए, मुंबई, बनारस हिंदू विश्वविद्यालय, पं. जसराज ऑडिटोरियम (न्यूयॉर्क) अशा काही प्रतिष्ठित महोत्सवांमधे त्यांनी कार्यक्रम सादर केले आहेत.

घैसास

Continue reading

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...
Skip to content