Homeकल्चर +‘श्रीपाद राजम शरणं...

‘श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये’च्या दुसऱ्या पर्वात बघा श्रीपादांच्या बाललीला!

‘श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये’, या वेब सिरीजचे पहिले पर्व २० भागांचे होते. त्यात ‘श्रीपाद श्रीवल्लभ’ यांच्या जन्माचे प्रयोजन आणि बापनाचार्य, सुमती महाराणी, अपलराज शर्मा यांच्याकरवी श्री दत्त महाराजांनी त्यांच्याच अवताराची योजना कशी अंमलात आणवून घेतली हे पाहायला मिळाले.

त्याचबरोबरीने तत्कालीन पिठापूर मधील ब्राह्मण सभेचे अध्यक्ष नरसावधानी हे स्वतः दत्तभक्त असूनदेखील श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या जन्माविषयी संपूर्ण पिठापुरात बापनाचार्य, सुमती महाराणी आणि अपलराज शर्मा यांच्या विरोधात सूर लावून त्यांना पिठापूरमधून कायमचे हद्दपार करण्याची भूमिका घेतली. परंतु श्रीपाद यांचा जन्म ठरल्याप्रमाणे झाला. त्यामुळे नरसावधानी यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांच्याकरवी अक्षम्य अशा चुका होत गेल्या हेही पाहायला मिळाले.

या वेब सिरीजच्या दुसऱ्या पर्वात आपल्याला श्रीपाद राजे दोन वर्षांचे झाल्यानंतरच्या घटना आणि बाल श्रीपादांच्या लीला पाहायला मिळणार आहेत. यात स्वतः श्रीपाद राजे यांच्यासाठी दुधाची समस्या निर्माण होते आणि त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्यांचे आप्तेष्ट कोणकोणत्या मार्गांनी ती सोडवायचा प्रयत्न करतात हे पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे दुसरीकडे नरसावधानीसोबत श्रीपाद राजेंचा विरोध करीत त्यांचे अस्तित्त्व अमान्य करीत कोण कोण काय काय व्यूह रचतात ते पाहायला मिळेल. सरतेशेवटी या सर्व प्रतिकूल परिस्थितीतून सुमती महाराणी आणि बापनाचार्य श्रीपादांच्या नामाने कसे निभावून नेतात ते अनुभवायला मिळेल.

साधारण ७०० वर्षांपूर्वीचा काल दाखविणाऱ्या या संपूर्ण सिरीजचे शूटींग कोकणातील निसर्गरम्य वातावरणात सुरू असून तिथले ग्रामस्थही या दत्त भक्तीचा आनंद घेत आहेत. या सिरीजचे निर्माते आणि दिग्दर्शक असित रेडीज यांनी कोकणातील अनेक कलाकारांची निवड या सिरीजमधील पात्रांसाठी केली आहें. कोकणातील या कलाकारांचे चेहरे प्रेक्षकांसाठी नवीन असल्यामुळेच या मालिकेतील व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करू लागल्या आहेत.

या मालिकेच्या चित्रिकरणासाठी अडीचशे वर्षांपूर्वीचा वाडा, प्राचीन मंदिरे, नद्या, डोंगर, जंगले अशी खरीखुरी स्थळे निवडली आहेत. यातील सादरीकरणाच्या खरेपणामुळेच की काय, प्रेक्षक दुसऱ्या पर्वाची अगदी आतुरतेने वाट पाहात होते. प्रेक्षकांच्या उंचावलेल्या अपेक्षा आणि वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन या मालिकेचे दुसरे पर्व अल्प विश्रांतीनंतर लगेच प्रेक्षकांच्या भेटीला आणले गेले आहे. दुसऱ्या पर्वातील ११ भागांमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या बाल रूपातील लीला पाहायला मिळतील. तेव्हा पाहायला विसरू नका “श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये”.. आपल्या “अवधूत चिंतन” या ओटीटी व्यासपीठावर!

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content