Sunday, April 27, 2025
Homeकल्चर +शनिवार-रविवारी आनंद घ्या...

शनिवार-रविवारी आनंद घ्या ‘आनंदवारी-नर्मदा आणि पंढरी’चा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे गेली वीस वर्षे ‘अध्यात्मरंग महोत्सव’ आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवांतर्गत अनेक विचारवंतांची व्याख्याने, किर्तने, प्रवचने सादर करण्यात आली. या वर्षी हा महोत्सव येत्या शनिवार व रविवारी म्हणजेच ७ आणि ८ ऑक्टोबरला ‘आनंदवारी-नर्मदा आणि पंढरी’ या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आला आहे.

शनिवार दि. ७ ॲाक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता उदयन् आचार्य यांचे ‘नर्मदा परिक्रमा-एक आनंदयात्रा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. याच नावाचे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले असून परिक्रमेतील त्यांचे अनुभव त्यांनी ओघवत्या शैलीत लिहिले आहेत. त्यांच्या व्याख्यानातून श्रोत्यांना परिक्रमेचा अनुभव घेतल्याचा आनंद मिळेल. उदयन् आचार्य नर्मदा तटावरील महेश्वर येथील सप्तमातृका मंदिरात वर्षातील बराच काळ वास्तव्य करून परिक्रमावासींची सेवा करतात.

रविवार दि. ८ ॲाक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता सुधीर महाबळ हे ‘एक तरी वारी अनुभवावी’ या विषयावर पंढरपूर वारीबद्दल बोलतील. वारी आणि परतवारीवरही ते आपले अनुभव कथन करतील. इलेक्ट्रॅानिक्स इंजिनिअर असलेल्या महाबळ यांनी बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पदावर काम केले आहे. आवड म्हणून ते अनेक वर्षं वारी आणि परतवारी करीत असून त्यांच्या “परतवारी” या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे.

हा महोत्सव सर्वांसाठी खुला असून श्रोत्यांनी या व्याख्यानांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. संस्थेच्या वा. वा. गोखले या वातानुकूलित सभागृहात ही व्याख्याने होतील. अधिक माहितीसाठी संपर्क- २४३०४१५०

Continue reading

श्री मावळी मंडळच्या कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरूवात

ठाण्याच्या श्री मावळी मंडळ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ७२व्या राज्यस्तरीय पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरूवात होत आहे. २९ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन आज सायंकाळी ७ वाजता खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे. विशेष...

पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारानिमित्त उद्या भारतात शासकीय दुखवटा

पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर उद्या, शनिवारी 26 एप्रिलला अंत्यसंस्कार केले जातील. त्यानिमित्त उद्या देशभरात शासकीय दुखवटा पाळला जाईल. उद्या संपूर्ण भारतात नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जाणाऱ्या इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल तसेच कोणताही अधिकृत मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही....

के. एस. चित्रा यांचं ‘तुझ्या प्रेमाची साथ मिळता..’ प्रदर्शित!

प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक नवीन रोमॅंटिक गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. पद्माराज नायर लिखित आणि दिग्दर्शित "माझी प्रारतना" ह्या चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालय. या गाण्यात स्वतः पद्माराज आणि अनुषा अडेपचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. या दोघा कलाकारांना आपण...
Skip to content