Homeएनसर्कलक्रिकेटची जननी इंग्लंड?...

क्रिकेटची जननी इंग्लंड? छे.. मूळ बेल्जियममध्ये!

क्रिकेट या खेळाची जननी इंग्लंड नसून बेल्जियममधील विणकरांनी सोळाव्या शतकात फ्लांडर्स प्रांतातून तो खेळ इंग्लंडकडे नेला, असा दावा बेल्जियमचे मुंबईतील वाणिज्यदूत फ्रॅंक गिरकीन्स यांनी काल मुंबईत केला.

गिरकीन्स यांनी सोमवारी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनात सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. क्रिकेट आज भारताचा जणू राष्ट्रीय खेळ झाला असून काहींच्या मते तर क्रिकेट येथील ‘धर्म’ आहे. बेल्जियममध्ये आज क्रिकेट मोठ्या प्रमाणावर खेळत नसले तरीही तो खेळ मुळात आमचा आहे. क्रिकेट या शब्दाची व्युत्पत्तीदेखील जुन्या फ्रेंच भाषेतील आहे, असे त्यांनी सांगितले.

मुंबई आणि बेल्जियममधील अँटवर्प दोन्ही हिऱ्यांच्या व्यापाराची शहरे आहेत आणि दोन्ही ठिकाणी व्यापारी बंदरे आहेत. बेल्जियममध्ये फ्लेमिश प्रांत, ब्रसेल्स व वलून हे तीन स्वायत्त प्रांत असून तेथे सशक्त प्रादेशिक सरकारे आहेत. भारतातील दूतावासात या तिन्ही प्रांतांचे व्यापार प्रतिनिधी बसतात व आपापल्या प्रांतात गुंतवणुकीसाठी प्रयत्न करतात, असेही गिरकीन्स म्हणाले.

भारतातील लोकांना  बेल्जियमबाबत अधिक माहिती व्हावी व बेल्जियमच्या लोकांना भारताबद्दल माहिती व्हावी यादृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत. लवकरच बेल्जियमकडे युरोपीय संघाचे अध्यक्षपद येत असून या काळात आपण भारताशी मैत्रीपूर्ण संबंध अधिक वृद्धींगत करण्याबाबत प्रयत्न करणार आहोत. ‘पिकू’ चित्रपटाचे सुरुवातीचे बरेचसे चित्रिकरण बेल्जियममध्ये झाले असल्याचे सांगून आपण भारतीय चित्रपट उद्योगालादेखील आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर चालना देणार असल्याचे गिरकीन्स यांनी सांगितले.

बेल्जियमच्या गेंट, लूवन व ब्रसल्स मुक्त विद्यापीठांचे भारतातील काही विद्यापीठांशी शैक्षणिक सहकार्य करार झाले असल्याबद्दल आनंद व्यक्त करून बेल्जियमने महाराष्ट्रातील विद्यापीठांसोबतदेखील सहकार्य प्रस्थापित करावे, असे राज्यपाल बैस यांनी वाणिज्यदूतांना सांगितले. बेल्जियमच्या १६० कंपन्या भारतात काम करीत आहेत. उभयपक्षी प्रयत्न केल्यास दोन्ही देशांचा व्यापार सध्याच्या १५.१ बिलियन युरोवरून मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, असेही राज्यपालांनी सांगितले. पहिल्या महायुद्धात फ्लॅण्डर्स येथे वीरमरण प्राप्त झालेल्या भारतातील ९००० शाहिद जवानांचे वायप्रेस येथे स्मारक बनविल्याबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केले. 

Continue reading

जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दत्तात्रय उत्तेकर यांचे यश

केप टाऊन, दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या इक्विप्ड व क्लासिक जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या दत्तात्रय अर्जुन उत्तेकर यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व मास्टर्स-४ (६६ किलो वजनी गट) मध्ये केले. त्यामध्ये त्यांनी इक्विप्ड गटात चार सुवर्णपदके मिळवली. क्लासिक स्पर्धेत त्यांनी एक...

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता

सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात असे दोन कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहेत. त्यातील एक कमकुवत होत जाण्याची चिन्हे असून दुसऱ्याची तीव्रता वाढत आहे. त्यांची दिशा पाहता महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील आठवडाही अवकाळी तडाखा राहू शकतो....

कोमसाप दादरची रंगली महफील ‘काव्य रंग’!

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग' कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात...
Skip to content