Homeन्यूज अँड व्ह्यूजराजकीय पक्षांना निवडणूक...

राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाची ताकीद

देशातील निवडणूक प्रक्रियेच्या प्रचारादरम्यान समाजमाध्यमांचा वापर करताना काही राजकीय पक्ष / त्यांचे प्रतिनिधी यांच्याकडून एमसीसी अर्थात आदर्श आचारसंहितेचा तसेच विद्यमान कायदेशीर तरतुदींचा भंग झाल्याच्या वृत्तांची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने काल राजकीय पक्ष आणि त्यांच्या प्रतिनिधींना निवडणुकीच्या प्रचारादरम्यान समाजमाध्यमांचा वापर जबाबदारी आणि नैतिकतेने करण्याचे निर्देश दिले.

निवडणूक आयोगाने माहितीचा विपर्यास करणारे किंवा चुकीच्या माहितीचा प्रसार करणारे डीप फेक तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधनांचा गैरवापर करण्याबाबतदेखील राजकीय पक्षांना ताकीद दिली आहे. प्रचारादरम्यान चुकीच्या माहितीचा वापर तसेच डीपफेक प्रकाराचा वापर करून केलेली तोतयागिरी यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठीच्या नियामकीय आराखड्याचे संचालन करणाऱ्या विद्यमान कायदेशीर तरतुदींची माहितीदेखील निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या निदर्शनाला आणून दिली आहे. यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 तसेच माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल माध्यमविषयक नैतिक संहिता) नियम 2021, भारतीय दंड विधान यांच्यासह जनतेचे प्रतिनिधित्वविषयक कायदा, 1950 आणि 1951 नामक दुहेरी कायदा तसेच आदर्श आचारसंहितेमधील तरतुदींचा समावेश आहे.

सध्याच्या कायदेशीर तरतुदी लक्षात घेता, इतर अनेक निर्देशांसह, राजकीय पक्षांना विशेष करून डीप फेक ध्वनीफिती/चित्रफिती प्रकाशित आणि प्रसारित करणे, चुकीची माहिती अथवा उघडउघड खोटी असलेली, खरी नसलेली अथवा दिशाभूल करणारी माहिती पसरवणे या गोष्टी करण्यापासून लांब राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच त्यांना महिलांविषयी अपमानास्पद मजकूर पोस्ट करणे, प्रचारामध्ये लहान मुलांचा वापर करणे, हिंसा दर्शवणे किंवा प्राण्यांना दुखापत करणे अशा कृती टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अशा प्रकारच्या मजकुराची माहिती निदर्शनाला आणून दिल्यापासून तीन तासांच्या आत तत्परतेने ती माहिती मंचावरून काढून टाकणे, पक्षातील जबाबदार व्यक्तीला ताकीद देणे, बेकायदेशीर माहिती अथवा बनावट वापरकर्त्याच्या अकाऊंटबाबत संबंधित मंचांना माहिती देणे आणि अशा प्रकारची प्रकरणे सतत निदर्शनास येत असल्यास माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमांची नैतिक संहिता) नियम, 2021 मधील नियम 3 ए अंतर्गत तक्रारविषयक अपील समितीकडे त्याची तक्रार करणे, असे निर्देश आयोगाने राजकीय पक्षांसाठी जारी केले आहेत.

Continue reading

श्रीवर्धनमधले ठाकरेंचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंच्या हाती घड्याळ

श्रीवर्धनमधील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंनी आज मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुर्वे तुम्ही माझ्यासोबत येत आहात. हा आज माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल...

AIमुळे साखरेच्या उताऱ्यात 20% तर ऊस उत्पादनात 30% वाढ!

AI तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात 30% वाढ आणि साखरेच्या उताऱ्यात 20% वाढ यशस्वीपणे साधता आली आहे. शिवाय, पीकवाढीचा कालावधी 6 महिने कमी झाला आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर हा AI आधारित ऊस शेतीचा प्रयोग करण्यात...

आयातुल्लाह खामेनेईंची होणार सद्दामसारखी अवस्था?

इराण आणि इस्रायल संघर्षात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट करत म्हटले आहे की, इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी. इराणच्या आकाशावर आमचे नियंत्रण आहे. इराणचे सर्वेसर्वा कुठे आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला...
Skip to content