Homeटॉप स्टोरीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ...

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि यापुढेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच राहतील, असे स्पष्ट विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या सहकाऱ्यांसह सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर काही दिवसातच अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा काही जणांकडून केली जात आहे. अजित पवार यांचा नुकताच वाढदिवस झाला. यानिमित्ताने त्यांचे सहकारी आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील असे सूचित केले. आज सकाळीच काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील असा दावा केला. येत्या काही दिवसांतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा निर्णय घेतला जाईल, असे चव्हाण म्हणाले.

शिंदे

हा धागा पकडून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हल्ली काहीजण राजकीय भविष्यवेत्ते झाले आहेत. परंतु तसे काहीही होणार नाही. येत्या नऊ तारखेलाही नाही, दहा तारखेलाही नाही आणि अकरा तारखेलाही नाही. महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील. मुख्यमंत्री बदलला जाणार नाही. पण झाला तर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि तेही मुख्यमंत्री शिंदे ठरवतील. महायुतीतल्या एका मोठ्या पक्षाचा नेता म्हणून मी हे सांगतो.

महायुती निर्माण करतानाच अजित पवार यांना ते कोणत्या पदावर असणार आहेत, याची कल्पना दिलेली आहे आणि ते त्यांनाही माहित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मी तसेच अजित पवार या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना कोण काय असणार आहे माहित आहे आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. मात्र महायुतीतले काहीजण उगाचच संभ्रम निर्माण करण्याचे काम करतात. विरोधी पक्षातले नेतेही तसाच प्रयत्न करतात. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content