Homeकल्चर +राज्यपालांच्या हस्ते 'एक...

राज्यपालांच्या हस्ते ‘एक और दुष्यंत’चे प्रकाशन

बांधकाम व्यावसायिक व कवी अतुल अग्रवाल यांनी लिहिलेल्या ‘एक और दुष्यंत’ या गजलसंग्रहाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी मुंबईत राजभवन येथे झाले.

मुंबई हिन्दी अकादमी, या संस्थेतर्फे आयोजित या प्रकाशन सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष पवन तिवारी, सचिव रामकुमार, साहित्यिक डॉ. करुणाशंकर उपाध्याय आदी उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध लेखक राजेंद्र श्रीवास्तव, मनोज कुमार गोयल, ‘पासबान ए अदब’चे संस्थापक कैसर खालिद, शायना एन.सी., डॉ. स्मिता दातार, संजीव निगम, अनघा गांगल, राखी तांडेल व प्रवीण कुमार सागर यांना साहित्य, समाज व शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.

 “दिव्यांग युवा महोत्सव 2023”साठी प्रवेशिका पाठवा!

‘नूतन गुळगुळे फाऊंडेशन’ (NGF) ही शारीरिक आणि मानसिक दिव्यांगांना त्यांचे अधिकार आणि सन्मान मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेली संस्था आहे. गेली ८ वर्षे ही संस्था राष्ट्रीय ध्येयपूर्ती पुरस्कारांद्वारे देशभरातील दिव्यांग बांधवांचा गौरव करते. त्यासोबत मागील दोन वर्षांपासून “राज्यस्तरीय आंतरशालेय दिव्यांग युवा महोत्सव” ही संस्था आयोजित करीत आहे. या महोत्सवात दिव्यांगांना गायन, नृत्य आणि वादन या विभागातील आपली कला सादर करता येते.

“NGF दिव्यांग युवा महोत्सव – 2023”साठी महाराष्ट्रातील विविध शाळांनी आपल्या प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात येत असून एका शाळेला जास्तीतजास्त ६ प्रवेशिका सादर करण्याची मुभा असणार आहे. फक्त ‘विशेष’ शाळांनीच या प्रवेशिका सादर कराव्यात. प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख १५ जानेवारी २०२३ असून हा महोत्सव फेब्रुवारी 2023मध्ये मुंबईत होणार आहे.

विशेष शाळांतील अर्जदाराची मूलभूत पात्रता:

सहभागींना कोणत्याही विशेष शाळेने नामांकित केले पाहिजे.

सहभागींना “दिव्यांग” (21 दिव्यांग श्रेणींपैकी कोणतेही) प्रमाणित केले पाहिजे.

वयोमर्यादा नाही.

खालील विभागात स्पर्धा असेल:

गायन- एकल / द्वंद्वगीत

वाद्य- सोलो / बँड

नृत्य- एकल / समूह 

इच्छुक विशेष शाळांनी त्यांचे अर्ज कुरिअरद्वारे पूर्ण बायोडेटा/संक्षिप्त प्रोफाइल, सादर करावयाच्या श्रेणी/अपंगत्वाची टक्केवारी (अधिकृत प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत) १५ जानेवारी २०२३पूर्वी पाठवावेत किंवा nutangulgulefoundation@gmail.com वर इमेलद्वारे पाठवावी. अधिक माहितीसाठी नूतन गुळगुळे यांच्याशी 9819141906, 9920383446 संपर्क साधावा.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content