Homeएनसर्कलइझमायट्रिपने कॉर्पोरेट ट्रॅव्‍हल...

इझमायट्रिपने कॉर्पोरेट ट्रॅव्‍हल बिझनेस विभाग केला लाँच!

इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्‍हल टेक व्‍यासपीठाने विशेष कॉर्पोरेट ट्रॅव्‍हल बिझनेस विभाग लाँच केला आहे. या लाँचसह कंपनीचा कॉर्पोरेट विश्‍वाच्‍या मागण्‍यांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेले बीस्‍पोक सोल्‍यूशन्‍स प्रदान करत बिझनेस ट्रॅव्‍हलचा अनुभव नव्‍या उंचीवर नेण्‍याचा मनसुबा आहे.

इझमायट्रिपचा कॉर्पोरेट ट्रॅव्‍हल बिझनेस कॉर्पोरेट्सना अद्वितीय फायदे देतो, तसेच बिझनेस ट्रॅव्‍हलचा आनंद घेण्‍याच्‍या पद्धतीमध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणत आहे. हे फायदे आहेत कॉर्पोरेट दर देणाऱ्या सर्वोत्तम उपक्रमांच्‍या माध्‍यमातून धोरणात्‍मक खर्च बचत, व्‍यापक सूट आणि लॉयल्‍टी रिवॉर्ड्स, जे काळासह अधिक बचत करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. जागतिक सहयोगींच्‍या व्‍यापक नेटवर्कसह इझमायट्रिप स्‍थानिक कौशल्‍यांच्‍या माध्‍यमातून जागतिक पोहोच वाढवण्‍याची खात्री घेते, आंतरराष्‍ट्रीय मानक प्रदान करण्‍यासह स्‍थानिक सेवा व पाठिंबा देते.

तसेच, प्रत्‍येक कॉर्पोरेट क्‍लायण्‍टला समर्पित अकाऊंट मॅनेजर नियुक्‍त करण्‍यात आला आहे, जो तज्ञ मार्गदर्शन, त्‍वरित समस्‍येचे निराकरण आणि सानुकूल सोल्‍यूशन्‍स देतो. पारदर्शकता व विश्‍लेषणांना प्राधान्‍य देण्‍यात आले आहे, ज्‍याचे श्रेय सर्वसमावेशक रिपोर्टिंग टूल्‍सना जाते, जे कॉर्पोरेट्स धोरणकर्त्‍यांना ट्रॅव्‍हल खर्चांचे विश्‍लेषण करण्‍यासाठी, अनुपालनावर देखरेख ठेवण्‍यासाठी आणि अधिक बचतींकरिता संधींचा शोध घेण्‍यासाठी सक्षम करतात.

ब्लू स्मार्ट

इझमायट्रिपचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी निशांत पिट्टी म्‍हणाले, बिझनेस ट्रॅव्‍हल फ्लाइट किंवा हॉटेल बुकिंग करण्‍याच्‍या सुविधेसह एकसंधी अनुभव देखील देते, ज्‍यामुळे व्‍यावसायिकांना त्‍यांच्‍या कामावर लक्ष केंद्रित करता येते. आमचे कॉर्पोरेट ट्रॅव्‍हल बिझनेस उत्तम सेवा असण्‍यासह धोरणात्‍मक व्‍यवसाय सहयोगी देखील आहे, ज्‍याचा संपूर्ण कॉर्पोरेट प्रवास अनुभवामध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणण्‍याचा मनसुबा आहे.

इझमायट्रिप सोयीसुविधा व स्थिरतेला प्राधान्‍य देते, ज्‍यामुळे बिझनेस ट्रॅव्‍हल त्रासमुक्‍त होतो. त्‍यांचे अत्‍याधुनिक बुकिंग व्‍यासपीठ चालता-फिरता बदल करण्‍यासाठी रिअल-टाइम अपडेट्स, त्‍वरित कन्‍फर्मेशन्‍स आणि स्थिरता देते. तसेच चोवीस तास साह्य उपलब्‍ध आहे, ज्‍यामधून कधीही, कुठेही फोनवरून साह्यतेची खात्री मिळते. हे संयोजित फायदे नवीन उद्योग मानक स्‍थापित करत कॉर्पोरेट ट्रॅव्‍हलला नव्‍या उंचीवर नेतात, जेथे दर्जा, किफायतशीरपणा व ग्राहक समाधानाचा प्राधान्‍य देण्‍यात आले आहे.

Continue reading

आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ३ हेक्टरपर्यंत आर्थिक मदत

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्यशासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी शासनाने मान्यता दिली होती. आता या शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख ४१...

खारपाड जमीनीवरचा खजूर लागवडीचा प्रयोग कोकणातही उपयोगी?

गुजरातच्या सौराष्ट्रमधील अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील एका शेतकऱ्याने खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. हा अनोखा पॅटर्न कोकणातील अन् राज्यातील क्षारयुक्त, खारट शेतजमीनधारकांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. सावरकुंडला येथील या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे- घनश्यामभाई चोडवडिया. त्यांच्या...

‘कोटक सिक्युरिटीज’ने सुचविले काही धमाकेदार दिवाळी शेअर्स!

"कोटक सिक्युरिटीज"ने वर्षभरात 34%पर्यंत रिटर्न्स देतील असे खात्रीशीर धमाकेदार शेअर्स या दिवाळीत गुंतवणुकीसाठी सुचविलेले आहेत. पुढील दिवाळीपर्यंत चांगली कामगिरी करू शकतील असे 7 स्टॉक या ब्रोकरेज हाऊसने शॉर्टलिस्ट केले आहेत. अदानी पोर्ट्स-सध्याची किंमत (CMP): ₹ 1,419पुढील दिवाळीपर्यंत टार्गेट: ₹ 1,900गुंतवणुकीवर...
Skip to content