Monday, November 4, 2024
Homeब्लॅक अँड व्हाईटअरबी समुद्राची उत्पादकता...

अरबी समुद्राची उत्पादकता वाढवत आहेत मध्यपूर्वेतील ‘धुलीकण’!

वाऱ्यामुळे हवेत पसरलेले वाळवंटातील धुळीचे कण हे जागतिक महासागराच्या पृष्ठभागावरील वनस्पती, म्हणजेच फायटोप्लँक्टनसाठी पोषक घटक आणि धातूच्या सूक्ष्म कणांचा पुरवठा करण्यामध्ये महत्वाचे योगदान देतात. हे धूलिकण अरबी समुद्रातील खनिजे आणि पोषक घटकांचे प्रमुख स्त्रोत असून, ते  या प्रदेशाची उत्पादकता वाढवतात आणि वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइडचे (CO2) पृथक्करण करण्यासाठी उपयोगी ठरतात.त्याचे महत्त्व असूनही, अरबी समुद्रावर जमा होणार्‍या धूलीकणांचा एकंदर परिणाम अद्याप लक्षात आला नसून, जैव-भू-रसायनशास्त्र मॉडेलर्स अनेकदा उपग्रह रिमोट सेन्सिंग उत्पादनांवर आधारित धुळीच्या स्त्रोत क्षेत्रांच्या गुणात्मक मापदंडावर अवलंबून राहतात.

अनेक संशोधकांच्या मते, धूळ वाहतुकीची गतिशीलता आणि अरबी समुद्रावरील त्याचा प्रभाव, ही प्रक्रिया प्रामुख्याने उन्हाळ्याच्या हंगामात होते, आणि हिवाळ्यात अरबी समुद्रात वाहून नेल्या जाणार्‍या धुळीमध्ये धुराचे कण (उदा. काजळी, सल्फेट्स आणि नायट्रेट्स) यांचे प्रमाण सर्वाधिक असते. आजूबाजूला अनेक ठिकाणी जमिनीचा प्रदेश असूनही, हिवाळ्यात अरबी समुद्रामध्ये खनिज कण वाहून नेण्यामध्ये योगदान देणाऱ्या धुळीचा मूळ स्रोत कोणता, हे अद्याप स्पष्ट नाही.

या पारंपरिक माहिती व्यतिरिक्त, सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था, डोना पॉला, गोवा, येथे प्रथमच, हिवाळ्यातील समुद्रपर्यटना दरम्यान गोळा करण्यात आलेल्या अरबी समुद्राच्या पृष्ठभागावरील खनिज धुलीकणांच्या Sr आणि Nd समस्थानिक रचनेवर आधारित, एक अभ्यास करण्यात आला, आणि त्यामधून हे धूलीकण सौदी अरेबिया/इराणमधील धुळीच्या वादळांमुळे जमा होत असल्याचे निश्चित झाले. 

अरबी समुद्रातील संशोधन मोहिमेदरम्यान आर/व्ही सिंधू साधना या जहाजावर हे धूलिकण गोळा करण्यात आले. हवा आणि समुद्रामध्ये तसेच पाण्याच्या स्तंभामधील धातू कणांचे वर्तन समजून घेण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या जिओट्रेसेस (GEOTRACES) नावाच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमा अंतर्गत भारताने हा उपक्रम राबवला. प्रत्येक एअर पार्सल वाहतूक पॅटर्नच्या उत्पत्तीवर आधारित, मोजण्यात आलेल्या नमुना धातू कणांच्या जोडीची तुलना मध्य पूर्व आणि दक्षिण आशियाच्या वाळवंटातील पृष्ठभागावरील धूलीकण/भूभागाशी करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान, संशोधन पथकाला अरबी समुद्रावरील दोन मोठ्या धुळीच्या वादळांचा सामना करावा लागला. अरबी समुद्रावर 27 जानेवारी 2020 रोजी आलेल्या धुळीच्या वादळाचा स्रोत सौदी अरेबियामध्ये होता, तर अरबी समुद्रात 10 फेब्रुवारी 2020 रोजी निर्माण झालेले दुसरे धुळीचे वादळ प्रामुख्याने इराण आणि भारतातील इंडो-गंगेटिक प्लेन (IGP) येथून आले होते. विशेष म्हणजे, पहिल्या वादळामध्ये गोळा केलेला धुळीचा नमुना मध्य अरबी समुद्रामध्ये गोळा केलेल्या इतर धुळीच्या नमुन्यांप्रमाणे आहे. यामधून अरबी द्वीपकल्पातील धूलिकणांच्या प्रादुर्भावाचे महत्त्व सूचित होते, जे हिवाळ्याच्या हंगामात खनिज मिश्रित धूलीकण जमा करते. एकूणच, हा अभ्यास हिवाळ्याच्या हंगामात अरबी समुद्रावर मध्य पूर्वेतून येणाऱ्या धुळीच्या वादळांचे महत्त्व अधोरेखित करतो. तथापि, दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात भारतीय द्वीपकल्पामधील धूळ जमा होते.

Continue reading

आज भाऊबीज (यमद्वितीया)!

आज भाऊबीज. या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची माहिती सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखाच्या...

दिवाळीत आग लागल्यास फोन करा १०१ किंवा १९१६ क्रमांकावर!

दीपावलीचा मंगलमय सण साजरा करताना नागरिकांनी योग्य दक्षता बाळगावी. दिवाळीत फटाके फोडताना लहान मुलांची जास्त काळजी घ्‍यावी. फटाके रात्री १० वाजेपर्यंत फोडावेत. या काळात आग अथवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास तत्काळ १०१ किंवा नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक १९१६ यावर...

महागाई शिगेला! ‘आनंदाचा शिधा’ आचारसंहितेच्या कचाट्यात!!

खरंतर महागाईबाबत दिवाळीत लिहिण्यासारखे तसे काही नसतेच! परंतु दोनच दिवसांपूर्वी हिंदू, या वर्तमानपत्राने महागाईबाबत एक संपूर्ण पानभर आरखेन वगैरे देऊन जवळजवळ बत्तीच लावली आहे. 'दोन वेळचे जेवण झपाट्याने महाग होत आहे, तर उत्पन्नात मात्र काहीच वाढ नाही, अशा आशयाचे...
Skip to content