नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक, 2023 वर राज्यसभेत चर्चा होत असताना एका ऐतिहासिक घडामोडीमध्ये, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष, जगदीप धनखड यांनी, दिवसभरासाठी राज्यसभेतील 13 महिला सदस्यांचा समावेश असलेल्या उपाध्यक्षांचे पॅनेल तयार केले आहे.

उपराष्ट्रपतींनी यावेळी नमूद केले की, या खुर्चीवर महिलांची उपस्थिती संपूर्ण जगाला एक शक्तिशाली संदेश देईल आणि बदलाच्या या कालखंडात महिलांनी एक ‘कमांडिंग पोझिशन’ धारण केली होती याचे ते प्रतीक ठरेल.

उपसभापतींच्या पॅनेलमध्ये नामनिर्देशित केलेल्या महिला राज्यसभा सदस्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
- पी. टी. उषा
- एस. फांगनोन कोन्याक
- जया बच्चन
- सरोज पांडे
- रजनी अशोकराव पाटिल
- डॉ. फौजिया खान
- डोला सेन
- इंदु बाला गोस्वामी
- डॉ. कनिमोझी एनवीएन सोमू
- कविता पाटीदार
- महुआ माजी
- डॉ. कल्पना सैनी
- सुलता देव