Homeकल्चर +२० मेला दुर्गा...

२० मेला दुर्गा भागवत – एक शोध!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, दि. २० मे रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता “दुर्गा भागवत – एक शोध” हे व्याख्यान आणि लघुपट असा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे.

दुर्गाबाई भागवत यांचे वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारात मोठे योगदान आहे. अंजली किर्तने या दुर्गाबाईंवर माहिती देतील. नंतर त्यांनी स्वतः तयार केलेला दुर्गाबाईंवरील लघुपट दाखवण्यात येईल. या कार्यक्रमाला डॅा. सुधा जोशी यांनी आर्थिक सहाय्य केले असून रसिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Continue reading

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...
Skip to content