Homeमाय व्हॉईसमद्यसेवनाने वाढते नकारात्मकता...

मद्यसेवनाने वाढते नकारात्मकता तर नारळपाण्याने सकारात्मकता!

व्यक्तींनी मद्यसेवन केल्यानंतर ऑरा स्कॅनरने घेतलेल्या चाचणीवरून असे लक्षात आले की, त्यांच्यातील नकारात्मकता वाढून सकारात्मकता केवळ ५ मिनिटांत पूर्णपणे नाहीशी झाली. याउलट, नारळपाणी या सात्त्विक पेयाच्या सेवनानंतर व्यक्तींच्या प्रभावळीवर त्वरित सकारात्मक परिणाम झाला,असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे शॉन क्लार्क यांनी केले.

नुकतेच बँकॉक, थायलँड येथे नुकत्याच झालेल्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन हॅप्पीनेस अँड वेल-बिईंग (ICHW2024)’ या परिषदेत क्लार्क बोलत होते. त्यांनी ‘सूक्ष्म सकारात्मक स्पंदने आनंदप्राप्तीचाचा शोध कसा सक्षम करतात’ हा शोधनिबंध सादर केला. याचे लेखक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले असून क्लार्क सहलेखक आहेत. ऑक्टोबर २०१६ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने २१ राष्ट्रीय आणि ९२ आंतरराष्ट्रीय, अशा एकूण ११३ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यापैकी १४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरण’ पुरस्कार मिळाले आहेत.

सात्त्विक वृत्तीचे लोक सकारात्मक सूक्ष्म स्पंदने निर्माण करतात, उत्तम गुणवत्तेचे विचार करतात आणि आनंद, स्थिरता अन् शांतीचा अनुभव घेतात. याउलट, तामसी वृत्तीच्या लोकांमध्ये व्यक्तिमत्त्वातील दोष अधिक असतात आणि त्यांच्या मनात कमी गुणवत्तेचे विचार असतात. ज्यामुळे त्यामध्ये नकारात्मक सूक्ष्म स्पंदने आणि तणाव निर्माण होतो, असे त्यांनी सांगितले.

शॉन क्लार्क यांनी सूक्ष्म स्पंदने व्यक्तीवर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव कसा करतात, याचा अभ्यास करणार्‍या काही चाचण्या सादर केल्या. प्रथम चाचणीत, व्यक्तींनी मद्यसेवन केल्यानंतर ऑरा स्कॅनरने घेतलेल्या चाचणीवरून असे लक्षात आले की, त्यांच्यातील नकारात्मकता वाढून सकारात्मकता केवळ ५ मिनिटांत पूर्णपणे नाहीशी झाली. याउलट, नारळपाणी या सात्त्विक पेयाच्या सेवनानंतर व्यक्तींच्या प्रभावळीवर त्वरित सकारात्मक परिणाम झाला.

द्वितीय चाचणीत रोगग्रस्त अवयव नकारात्मक स्पंदने कशी प्रक्षेपित करतात, हे दिसून आले. बालवयापासून त्वचारोगाने (Eczema) ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या चेहर्‍यावरून प्रक्षेपित होणारी नकारात्मक प्रभावळ केवळ आध्यात्मिक उपचार केल्याने कशी लक्षणीयरीत्या कमी झाली, हे त्यांनी या चाचणीत स्पष्ट केले.

तृतीय चाचणीत, २२ कॅरेट सोन्याने बनवलेल्या २ वेगवेगळ्या नक्षी असलेल्या अलंकारांची सूक्ष्म स्पंदनांच्या दृष्टीने तुलना केली गेली. जरी दोन्ही हार सोन्याचे असले, तरी सात्त्विक नक्षी असलेला सोन्याचा हार सकारात्मक स्पंदने प्रसारित करतो, याउलट तामसी नक्षीचा हार नकारात्मक स्पंदने प्रसारित करतो, असे आढळले. क्लार्क यांनी पुढे स्पष्ट केले की, हेवी मेटलसारखे संगीत ऐकणे आणि भयपट पाहणे यासारख्या मनोरंजनात रममाण झाल्याने व्यक्तीच्या प्रभावळीमधील सकारात्मकता पूर्णपणे नाहीशी होऊ शकते. तसेच काळा रंग सर्वाधिक तामसी असल्याने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने नकारात्मकता अधिक प्रमाणात ग्रहण होते.

या सर्व चाचण्यांच्या निरीक्षणांवरून क्लार्क यांनी निष्कर्ष मांडला की, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया, नामजप करणे अन् आध्यात्मिक उपायपद्धती, उदा. मीठाच्या पाण्यात १५ मिनिटे पाय ठेवून उपाय करणे, हे व्यक्तीच्या प्रभावळीमधील सकारात्मकता वाढवण्याचे आणि मनात उत्तम गुणवत्तेचे विचार येण्यासाठी अत्यंत प्रभावी मार्ग आहेत, अशी माहिती महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन विभागाचे आशिष सावंत यांनी दिली.

संपर्कः ९५६१५७४९७२

Continue reading

देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त झाला ‘पैलवान दत्तक योजने’चा शुभारंभ

महाराष्ट्राच्या मातीने देशाला असंख्य मल्ल दिले; मात्र गरिबीमुळे अनेक गुणी पैलवानांची स्वप्ने आखाड्याबाहेरच थांबली. हीच परंपरा मोडून काढण्याचा निर्धार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (युडब्ल्यूएफआय) आणि देवाभाऊ केसरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात...

‘उधार का उजाला’चे गुरुवारी प्रकाशन

सदामंगल पब्लिकेशन प्रकाशित आणि कवयित्री प्रज्ञा जांभेकर लिखित ‘उधार का उजाला’, या हिंदी कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ येत्या गुरुवारी, ३० जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता मुंबईतल्या प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या मिनी थिएटरमध्ये होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि या कवितासंग्रहाचे...

जाणून घ्या, गुरू आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व!

उद्या आषाढ पौर्णिमा; म्‍हणजेच साधक, शिष्‍य ज्‍या दिवसाची अत्‍यंत आतुरतेने वाट पाहत असतो, तो गुरुपौर्णिमेचा मंगलमय दिवस! शिष्‍याच्‍या संपूर्ण जीवनाला व्‍यापून राहिलेल्‍या सर्वशक्‍तीमान आणि सर्वज्ञ गुरूंच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यासाठी, साधनेचे पुढील ध्‍येय गाठण्‍याचा निश्‍चय करण्‍यासाठी हा दिवस साधक...
Skip to content