Homeहेल्थ इज वेल्थडॉ. दीपक सावंत...

डॉ. दीपक सावंत यांनी मेळघाटासाठी दिला वॉर्मर!

मेळघाटातील सिमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात वॅार्मरची कमतरता लक्षात आल्यावर, राज्याच्या कुपोषण समितीच्या टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अमरावतीचे सिव्हील सर्जन यांना वॅार्मर मशीन सुपूर्द केले. यावेळी समीर शाह, सुभाष मेंगाणे, जय शाह आदी मान्यवर उपस्थित होते.

पावसाळयात थंड तापमान असते. त्यामुळे नवजात शिशू, जे कमी वजनाचे, अकाली जन्मलेले असतात त्यांना हायमोथर्मिया होण्याचा व त्यामुळे दगावण्याचा संभव असतो. याचवेळी जन्मत: कावीळही असते. अशावेळी या मशीनव्दारे उपचार होण्यास मदत होते. यापूर्वीही डॉ. सावंत यांनी सिमाडोह, साद्रावाडी, चिखलदरा येथे अशा मशीन दिल्या आहेत.

पावसाळ्यात विशेषत: हायपोथर्मियामुळे नवजात अर्भक क्रिटीकल होऊ नये, त्याचे शारीरिक तापमान संयमित राहावे व पुढील गुंतागुंत होऊ नये म्हणून डॉ. दीपक सावंत यांनी हे पाऊल उचलले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुपोषण निर्मूलन समितीच्या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी १९ जूनला नियुक्ती केली. त्यानंतर लगेचच त्यांनी पालघर, मेळघाटचा दौरा केला होता.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content