रविकिरण संस्थेच्या बालनाट्य स्पर्धेत ध्येयधुंद, हे बालनाट्य सर्वोत्कृष्ट ठरले. सहा पाय , हे बालनाट्य दुसरे तर झेप, हे बालनाट्य तिसरे आले. मैं ऐसा क्यूँ हूँ? आणि हमजा हाजिर हो.. या बालनाट्यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.
नुकतीच रविकिरण संस्थेची ३६वी बालनाट्य स्पर्धा मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिर येथे पार पडली. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेला या वर्षी प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. वेळेअभावी उशिरा आलेल्या काही प्रवेशिका नाईलाजाने नाकाराव्या लागल्या. या स्पर्धेचे उद्घाटन पु. ल. अकादमीचे संचालक संतोष रोकडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पारितोषिक वितरण समारंभाला ज्येष्ठ नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितहोते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश वांद्रे यांनी केले. यावर्षीची स्पर्धा डॉ. के. म. एस. शिरोडकरहायस्कूलचे शिक्षक स्मृतिगत ज्योतीराम कदम यांच्या नावे घेतल्याचे सांगताना अशा प्रकारचीस्पर्धा रविकिरण मंडळाने घ्यावी असे १९८४ साली कदम सरांनीच सुचविल्याचे वांद्रे यांनी आपल्या प्रास्ताविकेत सांगितले. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्योतीराम कदम सरांनी लिहिलेल्या बालनाट्यांची पुस्तके मंडळातर्फे प्रत्येक शाळा/संस्था प्रतिनिधींना मोफत वाटण्यात आली. रवींद्र नाट्य मंदिराचे लाईट्मन, गेटकिपर, नेपथ्य व्यवस्थापक यांच्या हस्ते या पुस्तकांच्या संचाचे वाटप करण्यात आले.
या स्पर्धेच्या निमित्ताने अशा निवृत्त शिक्षकांच्या कार्याची नोंद घेतली जाते. आपल्या सेवेमध्ये असताना जे शिक्षकांनी बालनाट्याचे लेखन/दिग्दर्शन करून स्पर्धेमध्ये सहभागी होतात त्यांचा यथोचित सन्मान करण्याची रविकिरणची परंपरा आहे. या वर्षी नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे मुख्याध्यापक दीपक कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या कारकिर्दीत आगळी-वेगळी म्हणजेच विज्ञाननिष्ठ बालनाटिका रविकिरणच्या रंगमंचावर सादर करण्यात आली.
सत्काराला उत्तर देताना कुलकर्णी म्हणाले की, एवढं मोठं व्यासपीठ मुलांना उपलब्ध करून देणारी संस्था फक्त रविकिरणच. तसंच साडेतीन दशकं हा उपक्रम चालू ठेवणं आणि तितक्याच उत्साहाने तो साजरा करणं हे केवळ कलाकार निर्मिती नसून यामागे एक सुसंस्कारी समाज आणि सुजाण प्रेक्षक निर्माण करण्याचा यज्ञच रविकिरणने सुरू केला.

या स्पर्धेच्या निमित्ताने उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे विलास येरम यांचा व मंडळाचे सभासद प्रमोद राणे यांची बेस्ट कामगार को. ऑप. सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच संस्थेचे सभासद महेंद्र पवार यांची भारत सरकारच्या भारतीय संस्कृतिक परिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मानपत्र-शाल-श्रीफळ देऊन प्रदीप मुळ्ये व स्पर्धेचे प्रायोजक एसबीआय लाईफच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. सत्कारालाउत्तर देताना प्रातिनिधिक म्हणून बोलताना महेंद्र पवार म्हणाले की, हे मानपत्र नव्हे तर ऋणपत्र आहे. आजवरच्या कारकिर्दीला केवळ रविकिरण परिवाराचा पाठिंबा असल्यामुळे आम्ही घडू शकलो आहोत.
या स्पर्धेच्या निम्मिताने प्रकाशित होणाऱ्या “स्मृतिपर्ण” या स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुणेप्रदीप मुळ्ये यांच्या हस्ते केले गेले. या स्मरणिकेत ज्येष्ठ नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णीव मंडळाचे कार्यकारी सदस्य महेंद्र पवार, ज्योतीराम कदम यांच्या बालनाट्य क्षेत्रातील कर्तृत्त्वाचा आढावा घेणाऱ्या लेखांचा समावेश करण्यात आला आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री विमल म्हात्रे, डॉ. माधुरी विनायक गवांदे, धनंजय सरदेशपांडे यांनी या स्पर्धेच्या परीक्षणाचे काम पहिले. या कार्यक्रमाला माजी महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन अशोक परब, नितीन नगरकर व सोहम पवार यांनी केले. खजिनदार गजानन राणे यांनी सगळ्यांचे आभार मानले.

या बालनाट्य स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
सर्वोत्कृष्ट बालनाट्य: ध्येयधुंद
शाळा/संस्थेचे नाव: रविंद्र शिक्षण प्रसारक मंडळ-डोंबिवली
व्दितीय बालनाट्य: सहा पाय
शाळा/संस्थेचे नाव: गुरुकुल द डे स्कूल- डोंबिवली
तृतीय बालनाट्य: झेप
शाळा/संस्थेचे नाव: कलासंस्कृती, कला वेधक संस्था-कल्याण
उत्तेजनार्थ बालनाट्य १: मैं ऐसा क्यूँ हूँ?
शाळा/संस्थेचे नाव: पार्ले टिळक विद्यालय-विलेपार्ले
उत्तेजनार्थ बालनाट्य २: हमजा हाजिर हो
शाळा/संस्थेचे नाव: विलेपार्ले महिला संघ-विलेपार्ले पूर्व
उत्कृष्ट संगीत (लाईव्ह)–
विजेत्याचे नाव: निहार शेंबेकर
बालनाट्याचे नाव: मैं ऐसा क्यूँ हूँ?
शाळा/संस्थेचे नाव: पार्ले टिळक विद्यालय-विलेपार्ले
उत्कृष्ट ध्वनी संकलन–
विजेत्याचे नाव: प्रितिश खंडागळे
बालनाट्याचे नाव: अदृश्य
शाळा/संस्थेचे नाव: सेक्रेड हार्ट स्कूल-वरप (कल्याण)
उत्कृष्ट प्रकाशयोजना–
विजेत्याचे नाव: विनोद राठोड
बालनाट्याचे नाव: ध्येयधुंद
शाळा/संस्थेचे नाव: रविंद्र शिक्षण प्रसारक मंडळ-डोंबिवली
उत्कृष्ट नेपथ्य–
विजेत्याचे नाव: रश्मी, दीपक, निलेश, राहुल
बालनाट्याचे नाव: आदिंबाच्या बेटावर
शाळा/संस्थेचे नाव: अश्वमेध नाट्यसंस्था-कल्याण
लेखन (प्रथम)-
लेखकाचे नाव: संदीप प्रभू गचांडे
शाळा/संस्थेचे नाव: आर्टिस्ट प्लॅनेट -काळाचौकी
बालनाट्याचे नाव: ये गं ये गं परी
लेखन (व्दितीय)-
लेखकाचे नाव: सुमीत विलास तांबे
शाळा/संस्थेचे नाव: पार्ले टिळक विद्यालय-विलेपार्ले
बालनाट्याचे नाव: मैं ऐसा क्यूँ हूँ
लेखन (तृतीय)-
लेखकाचे नाव: सुरेश शेलार
शाळा/संस्थेचे नाव: सेक्रेड हार्ट स्कूल-वरप ( कल्याण)
बालनाट्याचे नाव: अदृश्य
दिग्दर्शन प्रथम–
दिग्दर्शकाचे नाव: गौरी करकरे
शाळा/संस्थेचे नाव: रविंद्र शिक्षण प्रसारक मंडळ-डोंबिवली
बालनाट्याचे नाव: ध्येयधुंद
दिग्दर्शन व्दितीय–
दिग्दर्शकाचे नाव: वृषांक कवठेकर
शाळा/संस्थेचे नाव: गुरुकुल द डे स्कूल- डोंबिवली
बालनाट्याचे नाव: सहा पाय
दिग्दर्शन तृतीय–
दिग्दर्शकाचे नाव: रश्मी घुले
शाळा/संस्थेचे नाव: कलासंस्कृती, कला वेधक संस्था-कल्याण
बालनाट्याचे नाव: झेप

अभिनय (मुले) प्रथम-
मुलाचे नाव भूमिकेचं नाव: जय वीर (रंग्या)
शाळा/संस्थेचे नाव: विलेपार्ले महिला संघ-विलेपार्ले पूर्व
बालनाट्याचे नाव: हमजा हाजिर हो
अभिनय (मुले) व्दितीय–
मुलाचे नाव/भूमिकेचं नाव: राजवीर गानू (ज्यो)
शाळा/संस्थेचे नाव: रविंद्र शिक्षण प्रसारक मंडळ-डोंबिवली
बालनाट्याचे नाव: ध्येयधुंद
अभिनय (मुले) तृतीय–
मुलाचे नाव/भूमिकेचं नाव: ऋग्वेद आमडेकर (ऋषि)
शाळा/संस्थेचे नाव: गुरुकुल द डे स्कूल- डोंबिवली
बालनाट्याचे नाव: सहा पाय
अभिनय (मुले) उत्तेजनार्थ १–
मुलाचे नाव/भूमिकेचं नाव: लाभ घुले (मिठू)
शाळा/संस्थेचे नाव: रविंद्र शिक्षण प्रसारक मंडळ-डोंबिवली
बालनाट्याचे नाव: ध्येयधुंद
अभिनय (मुले) उत्तेजनार्थ २–
मुलाचे नाव/भूमिकेचं नाव: पराग तावडे(कलंदर)
शाळा/संस्थेचे नाव: के.एम्. एस्. डॉ.शिरोडकर हायस्कूल-परळ
बालनाट्याचे नाव: कणाचा मण
अभिनय (मुली) प्रथम–
मुलीचे नाव/भूमिकेचे नाव: शरयू गोसावी (सई)
शाळा/संस्थेचे नाव: आर्टिस्ट प्लॅनेट – काळाचौकी
बालनाट्याचे नाव: ये गं ये गं परी
अभिनय (मुली) व्दितीय–
मुलीचे नाव/भूमिकेचे नाव: भावना पाटील (डॉक्टर)
शाळा/संस्थेचे नाव: संदेश विद्यालय-विक्रोळी
बालनाट्याचे नाव: योद्धा
अभिनय (मुली) तृतीय–
मुलीचे नाव/भूमिकेचे नाव: निमिष मोरवणकर(निशा)
शाळा/संस्थेचे नाव: अश्वमेध नाट्यसंस्था-कल्याण
बालनाट्याचे नाव: आदिंबाच्या बेटावर
अभिनय (मुली) उत्तेजनार्थ १–
मुलीचे नाव/भूमिकेचे नाव: दिया गुप्ते (राणी मुंगी)
शाळा/संस्थेचे नाव: गुरुकुल द डे स्कूल- डोंबिवली
बालनाट्याचे नाव: सहा पाय
अभिनय (मुली) उत्तेजनार्थ २–
मुलीचे नाव/भूमिकेचे नाव: लावण्या कुळकर्णी(ईश्वरी)
शाळा/संस्थेचे नाव: सिटी प्राइड स्कूल-मोशी(पुणे)
बालनाट्याचे नाव: पट्टेरी

