Homeचिट चॅटराज्य ज्युदो संघटनेच्या...

राज्य ज्युदो संघटनेच्या अध्यक्षपदी पुन्हा धनंजय भोसले

महाराष्ट्र ज्युदो संघटनेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मतदारांनी अॅड. धनंजय भोसले यांच्यावर पुन्हा एकदा विश्वासदाखवत बहुमताने अध्यक्षपद बहाल केले तर शैलेश टिळक  यांची महासचिवपदी बिनविरोध निवड झाली.

मागील कार्यकारिणीमधील महासचिव असलेल्या औरंगाबादच्या दत्ता आफळे यांची तांत्रिक  समितीच्या सचिवपदी तर याच समितीचे अध्यक्ष म्हणून मुंबईच्या रवी पाटील यांची नियुक्ती झाली.

उपाध्यक्षपदाच्या चार जागांसाठी एकूण पाच उमेदवार रिंगणात होते. त्यातील राजकुमार  पुनकर (अमरावती), पुरूषोत्तम चौधरी (नागपूर), कावस बिलिमोरिया आणि यतीश बंगेरा  (मुंबई) यांना बहुमत मिळाले.

महाराष्ट्र ज्युदो संघटनेची सातारा येथे रविवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक  अधिकारी म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश दिलीप कृष्णा गायकवाड तर भारतीय ज्युदो  महासंघातर्फे कोषाध्यक्ष कैलास यादव, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने संघटनेचे  सहसचिव दयानंद कुमार यांनी निरीक्षक म्हणून काम पहिले.

महाराष्ट्र ज्युदो संघटनेची नूतन कार्यकारिणी अशी:

अध्यक्ष अॅड. धनंजय भोसले (सातारा)

उपाध्यक्ष राजकुमार पुनकर (अमरावती), पुरुषोत्तम चौधरी (नागपूर), कावस बिलिमोरिया आणि यतीश बंगेरा (मुंबई)

महासचिव शैलेश टिळक (रत्नागिरी)

कोषाध्यक्ष रविंद्र मेटकर (नाशिक)

सहसचिव डॉ. गणेश शेटकर (बीड)

सभासद- डॉ. सतीश पहाडे (अमरावती), अतुल बामनोदकर (औरंगाबाद), विकास पाटील (सातारा),  विश्वास जोशी (औरंगाबाद), चंद्रशेखर साखरे (सांगली), प्रविण गडदे (उस्मानाबाद), निलेश  गोयथळे (रत्नागिरी), जयंत साखरे (यवतमाळ), प्रविण कुपटीकर (नांदेड), दिनेश बागुल  (धुळे), निखिल सुवर्णा (ठाणे), वीरधवल पाटोळे (कोल्हापूर) यांची तर विशेष निमंत्रित सदस्यपदी रत्नाकर पटवर्धन (नाशिक), अर्चना केवाळे (अमरावती), शोभना शेटकर (बीड)  यांची राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली आहे.

तांत्रिक समिति अध्यक्ष– रविंद्र पाटील (मुंबई)

सचिव दत्ता आफळे (औरंगाबाद)

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content