Homeब्लॅक अँड व्हाईटस्वदेशी वेब ब्राउझर...

स्वदेशी वेब ब्राउझर विकसित करा आणि १ कोटी जिंका!

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 9 ऑगस्ट 2023 रोजी नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात इंडियन वेब ब्राउझर डेव्हलपमेंट चॅलेंजचा (आयडब्ल्यूबीडीसी ) प्रारंभ केला. एकूण 3.41 कोटी रुपयांच्या बक्षिसांपैकी, विजेत्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. विकसित ब्राउझरला पुढील स्तरांवर नेण्यासाठी विजेत्याला आणखी पाठबळ दिले जाईल.

वैज्ञानिक ‘जी’ श्रेणी आणि समूह समन्वयक (इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकास), सुनीता वर्मा, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या प्रमाणित प्राधिकरणांचे नियंत्रक अरविंद कुमार आणि सी-डॅक ,बेंगळुरूचे कार्यकारी संचालक डॉ. एस. डी. सुदर्शन यांनी संयुक्तपणे वेब ब्राउझर डेव्हलपमेंट चॅलेंजचा प्रारंभ केला. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या चॅलेंज संदर्भातील माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.

इंडियन वेब ब्राउझर डेव्हलपमेंट चॅलेंजचे नेतृत्व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, सीसीए आणि सी-डॅक बेंगळुरू करत आहे.

आयडब्ल्यूबीडीसी ही एक खुली चॅलेंज स्पर्धा असून ही स्पर्धा देशाच्या कानाकोपऱ्यातील तंत्रज्ञान उत्साही, नवोन्मेषक आणि विकासकांना स्वतःची विश्वासार्हता आणि इनबिल्ट सीसीए इंडिया रूट प्रमाणपत्र, अत्याधुनिक कार्यक्षमता आणि वर्धित सुरक्षा आणि डेटा गोपनीयता संरक्षण वैशिष्ट्यांसह स्वदेशी वेब ब्राउझर तयार करण्यासाठी प्रेरित आणि सक्षम करण्याचा प्रयत्न करते.

प्रस्तावित ब्राउझर प्रवेश सुलभता आणि वापरकर्तास्नेही वैशिष्ट्यांवरदेखील लक्ष केंद्रित करेल, विविध क्षमता असलेल्या व्यक्तींसाठी समर्थन सुनिश्चित करेल. याशिवाय ब्राउझर क्रिप्टो टोकन वापरून कागदपत्रांवर डिजिटल स्वाक्षरी करण्याच्या क्षमता संकल्पित करतो. सुरक्षित व्यवहार आणि डिजिटल परस्पर संवादांना चालना देतो.

सी-डॅक, बंगळुरूचे कार्यकारी संचालक डॉ. एस. डी. सुदर्शन यांनी संपूर्ण चॅलेंज स्पर्धेविषयी सविस्तर सांगितले. कोणीही या चॅलेंजमध्ये भाग घेऊन कल्पना सादर करू शकतो, असे त्यांनी नमूद केले. संपूर्ण चॅलेंज स्पर्धेमध्ये तीन फेऱ्या असतील, पहिल्या फेरीनंतर म्हणजेच कल्पनाशक्ती फेरीत 18 प्रवेशिका निवडल्या जातील. दुसऱ्या फेरीत 8 स्पर्धकांना अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी निवडले जाईल. शेवटी एक विजेता, प्रथम उपविजेता आणि द्वितीय उपविजेता निवडला जाईल. संपूर्ण चॅलेंजमध्ये तांत्रिक मार्गदर्शन प्रदान केले जाईल.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content