Homeमुंबई स्पेशलगणेश मूर्तिकारांसाठी अनामत...

गणेश मूर्तिकारांसाठी अनामत रक्कम आता १ हजाराऐवजी १०० रुपये!

गणेश मूर्तीकार / मूर्ती साठवणूकदार यांना परवानगीसाठी असलेली रु. १०००/- असलेली  अनामत रक्कम कमी करून ती रु. १००/- करण्याचा निर्णय काल मुंबईत झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला.

महानगरपालिका मुख्यालयात मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी संदर्भात आढावा बैठक मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, आमदार ॲड. आशिष शेलार, माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले.

गणेशोत्सवाच्या १५ दिवस आधी विसर्जन मार्गाचा आढावा घेऊन योग्य ती खबरदारी घेणे, विसर्जनाचे सर्व मार्ग व त्यावरील सर्व रस्ते खड्डेमुक्त करणे, शहरात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवणे, पीओपी मूर्ती विसर्जन झाल्यानंतर त्यांचे योग्य पद्धतीने विघटन केले जाईल याची काळजी घेण्याबाबतदेखील निर्देश देण्यात आले. चिनी बनावटीच्या मूर्तींवर आळा तसेच प्रतिबंध घालण्यासाठीसुद्धा पाऊले उचलली जातील. या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी आरोग्य शिबिरे भरविण्यात येतील. प्रत्येक गणेश मंडळाकडे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी दिवसातून ३ वेळेस मुंबई महानगरपालिकेच्या वतीने साफसफाई केली जाईल. गणेशमूर्ती विसर्जनावेळी काही अडथळे येऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री लोढा यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content