Monday, December 23, 2024
Homeमाय व्हॉईसअनिलबाबूंची गच्छंती बहाणा!...

अनिलबाबूंची गच्छंती बहाणा! तुरुंगवास निशाणा!!

जेव्हा जे तुमच्या, अनेकांच्या मीडियाच्या, जनतेच्या, नेत्यांच्या, दस्तुरखुद्द अनिल देशमुखांच्या मनातदेखील नव्हते तेव्हाच मी याठिकाणी लिहून ठेवले आहे, होते की अनिल देशमुख यांचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. त्यांचे मंत्रिपद जाणे काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्ही सारे तोंडावर पडले. माझे म्हणणे खरे ठरले. थोडक्यात आम्ही जे लिहितो ते खरे ठरते. म्हणून लिहिताना आम्ही शंभर वेळा विचार करून लिहितो. अन्यथा लिहायचा अवकाश की राजेंद्र शिंगणे यांचे उजवे हात रवी सपकाळ पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहेत. बघा, आमचे लिहिणे खरे ठरते किंवा नाही?

अर्थात यावेळीही जे लिहिले तेच खरे ठरले. अनिल देशमुख ५ एप्रिल रोजी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मोकळे झाले. अर्थात माझ्यापेक्षा अधिक कौतुक विजय दर्डा यांचे! कारण त्यांच्याच लोकमत दैनिकाच्या कार्यक्रमनिमित्ते एबीपी माझावर एक मुलाखत अनिल देशमुख यांची घेण्यात आली होती, ज्यात त्यांनी परमवीर सिंग यांच्या उचलबांगडीबद्दल नको ते वक्तव्य, तेही विजय दर्डा यांच्या शेजारी बसून त्यांनी केले आणि त्या क्षणापासून अनिलबाबुंचे काऊंटडाऊन सुरू झाले. थोडक्यात परमवीर सिंग यांची सटकली आणि दर्डा यांनी जे अनिलबाबूंना त्यांच्या मुलगी व जावयासमोर झापले होते ते खरे करून दाखवले.

अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाची लागलेली लॉटरी, त्यातून त्यांना झालेला गर्व, त्यामुळे ते अनेकदा आपल्या या दोस्ताचा म्हणजे विजय दर्डा यांचादेखील फोन घेईनासे झाले आणि विजयबाबूंची पार सटकली. तेव्हा त्यांनी अनिलबाबूंच्या मुलगी व जावयासमोरच रागाने संतापून पार उतरवून ठेवली. म्हणाले- ही सत्ता आणि असे सत्ताधीश अनिल, मला नवीन नाहीत. माझ्याशी मैत्री ठेवायची नसेल तर तसे सांग आणि पुढे नेमके तेच घडले. भलेही योगायोगाने पण अनिलबाबू यांची शेजारी बसलेल्या विजय दर्डांच्या साक्षीने एबीपी माझावर प्रसन्न जोशी यांनी घेतलेली मुलाखत गाजली खरी त्या दिवसापुरती. पण त्या क्षणापासूनच अनिल देशमुख यांचे काऊंटडाऊन सुरू झाले..

नालायक जनता आणि फेल्युअर राज्यकर्ते, त्यातून या राज्यात महाराष्ट्रात कोरोना पुन्हा जीवघेणा ठरला आहे. पूर्वीपेक्षा तो अधिक डेंजर ठरल्याने अनेक तरुण माणसे यावेळी आपला जीव गमावून बसताहेत. म्हणून माझा लिखाणातला सध्या बऱ्यापैकी मूड निघून गेला आहे. अन्यथा राज्याच्या राजकारणातले जीवाचा थरकाप उडवणारे अनेक किस्से माझ्या पोतडीत जमा झालेले आहेत. त्या अनिल देशमुख आणि त्यांच्या स्टाफविषयी तर कादंबरी निघेल एवढे पुरावे माझ्याकडे आहेत, जे मी नक्की सीबीआयकडे कसे पोहोचतील हे बघणार आहे.

अनिल देशमुख यांनी पाच एप्रिल रोजी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर सर्वाधिक कोण बरे खुश झाले? हे तुम्हाला माहित नसेल. किंबहुना, तुम्ही पण हत्ती व आंधळ्यांच्या गोष्टीसारखे आपापले अंदाज सांगून मोकळे व्हाल. मात्र, सर्वाधिक कोण व का खुश झाले हे याठिकाणी मीच तुम्हाला सांगणार आहे. आणि ती व्यक्ती परमवीर सिंग यांची जवळची नातेवाईक आहे, ज्या नातेवाईकालादेखील याच अनिल देशमुख यांनी एकेकाळी सत्तेच्या भरल्या ताटावरून उठवले आहे आणि ती व्यक्ती आहे नागपूरचे माजी खासदार, माजी मंत्री, शरद पवार यांचे एकेकाळचे या राज्यातले सर्वाधिक जिवलग व विश्वासू आणि सागर व समीर या दोन अत्यंत कर्तृत्त्ववान मुलांचे बाप दत्ता मेघे.

अनिल

नागपूरचे एक व्यावसायिक अरविंद देशमुख यांच्या घरी मी काही महिन्यांपूर्वी जेवायला गेलो होतो. विशेष म्हणजे माझ्या व दत्ता मेघे नामक माझ्या या लाडक्या नेत्याच्या छान गप्पा व्हाव्यात म्हणून मुद्दामच अरविंद देशमुख यांनी मोठ्या आनंदाने हे वऱ्हाडी आग्रहाचे जेवण घडवून आणले होते. आणि त्यावेळी झालेल्या गप्पात त्या अनिल देशमुख यांनी कसे माझ्या राजकीय यशाचे, राजकीय आयुष्याचे वाटोळे केले त्यावर मेघे माझ्याशी मनापासून बोलले होते. जणू ते त्यावेळी अनिलबाबूंना शिव्याशाप देत होते आणि आज त्याच दत्ता मेघे यांच्या जवळच्या नातेवाईकाने अनिल देशमुख यांना रस्त्यावर आणले आहे.

एवढेच नव्हे तर तो दिवस फार दूर नाही ज्यादिवशी अनिल देशमुख हेदेखील त्यांच्या काही स्टाफसहित नक्की गजाआड असतील. प्रफुल्ल पटेल यांनी अमित शाह यांच्याकडे अनिल देशमुख यांच्यासाठी प्रेस्टिज इश्यू केले तरच कदाचित नशिबाने अनिल देशमुख यांचे तुरुंगात जाणे टळू शकते. अन्यथा अनिलबाबूंना तुरुंगवास अटळ आहे..

दत्ता मेघे यांचे मोठे चिरंजीव सागर मेघे माजी आमदार आहेत आणि समीर मेघे धाकटे चिरंजीव विद्यमान आमदार आहेत. आणि याच सागर मेघे यांची ज्येष्ठ कन्या परमवीर सिंग यांची अत्यंत लाडकी सून आहे. म्हणजे त्यांच्या मुलाशी दत्ता मेघे यांच्या लाडक्या नातीचे लग्न झाले आहे. थोडक्यात ज्या मेघे यांना अनिल देशमुख यांनी राजकीय आयुष्यातून उद्ध्वस्त, बरबाद करून त्यांच्या डोळ्यात अश्रू आणले, ज्या मेघे यांना त्यांच्या अतिशय लाडक्या नेत्यांपासून, मित्रापासून म्हणजे शरद पवार यांच्यापासून कायमस्वरूपी तेही प्रफुल्ल पटेल यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून दूर नेले, दूर केले, त्याच मेघे परिवारातील एका सदस्याने एखाद्या सिनेमात शोभावा असा प्रसंग प्रत्यक्षात उतरवला आहे.

थोडक्यात मेघे यांनी आज या क्षणाला आपला जणू संपूर्ण राजकीय वचपा काढला आहे. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे परमवीर जसे पोलीस खात्यातले एक वजनदार म्हणून ओळखले जातात तसेच ते एका मोठ्या भाजपा तेही मराठा नेत्याचे जवळचे नातेवाईक असल्याने परमवीर यांची ती बाजूदेखील तेवढीच जमेची आहे. सर्वाधिक आश्चर्य मला वाटले ते नागपुरातले गांधी म्हणून जे ओळखले जातात त्या गिरीश गांधी यांचे. कारण याच दत्ता मेघे यांचे कट्टर समर्थक म्हणून एकेकाळी गिरीश गांधी यांची ज्या अनिल देशमुख यांनी संपूर्ण राजकीय कारकीर्द संपविली. म्हणजे गिरीश गांधी यांना आधी नागपूर शहर राष्ट्रवादी अध्यक्ष पदावरून पायउतार व्हावे लागले. नंतर त्यांच्यात व शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यात याच अनिल देशमुख यांनी जो कायमस्वरूपी दुरावा निर्माण केला, त्यातून पुन्हा गिरीश गांधी यांना विधान परिषद सदस्य म्हणजे आमदार, पवारांनी मुद्दाम केले नाही, त्याच गिरीश गांधी यांनी देशमुखांच्या राजीनाम्याआधी दोन दिवस त्यांच्या समर्थनार्थ म्हणजे अनिल देशमुख कसे निष्कलंक आहेत हे सांगणारे तद्दन खोटे पत्रक काढले. ते वाचून मला आयुष्यात पहिल्यांदा ही मोठी चूक करणाऱ्या गिरीश गांधी यांचा अतिशय मनापासून राग आला आणि तसे मी फोनवरून बोलूनपण दाखवले.

असे एक ना अनेक किस्से या अनिल देशमुखांचे. पण मलाही मनातून त्यांच्याविषयी आजही प्रेम असल्याने मी देशमुख यांच्यावर टीका टाळली. अन्यथा अनिलबाबू व त्यांचा अत्यंत नालायक स्टाफ, त्यांचे कुटुंबीय केव्हाच अडचणीत सापडले असते.. 

Continue reading

पवार पॉवर पर्व संपल्यात जमा…

आजपर्यंत, आजतागायत मी याआधी कधीही ना लिहिले, ना म्हटले की पवार संपले. पण आता पुन्हा नव्याने पक्ष बांधू असे जाहीर सांगणारे पवार संपूर्ण, पूर्णतः संपल्यात जमा आहेत. पण ते कसे यापुढे राजकीयदृष्ट्या जिवंत राहतील, त्यांचे अस्तित्त्व कसे आणखी टिकून...

शरद पवारांचे राजीनामानाट्य म्हणजे शुद्ध बनवाबनवी!

लबाड संधीसाधू ढोंगी नेत्यांना कायम मांजरीच्या डोळे मिटून दूध पिण्याच्या भूमिकेचे समर्थन करायला आवडते. पण ज्यांच्या हाती मतदानरुपी काठी आहे, असते ते या राज्यातले समस्त मतदार अतिशय चाणाक्ष, चतुर आणि हुशार असतात. दुर्दैवाने हे नेत्यांच्या लक्षात येत नाही. मग...

विधान परिषदेचे सभापती कोण? रामराजे की नीलमताई??

विधानसभा भाजपाच्या ताब्यात आहे. तेथे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई ऍडव्होकेट राहुल नार्वेकर अलीकडे अध्यक्ष झाले आहेत. विधान परिषदेचे सभापतीपद खाली आहे. विधान परिषदेच्या सभापतीचा कार्यभार उपसभापती उद्धव सेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे असला तरी...
Skip to content