Homeकल्चर +दिल्लीकरांनी अनुभवले मणिपुरी...

दिल्लीकरांनी अनुभवले मणिपुरी थांग-ता आणि शिवकालीन युद्धतंत्राचे थरारक क्षण!

दिल्लीतील भारत मंडपम् येथे सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशन आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच आयोजित करण्यात आलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवात भारताच्या गौरवशाली प्राचीन युद्धपरंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शौर्याचा सजीव, थरारक आविष्कार पाहायला मिळाला. या महोत्सवाने उपस्थितांमध्ये वीरश्री, राष्ट्रभक्ती आणि आत्मसंरक्षणाची तीव्र जाणीव जागवली. महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रकौशल्याचे प्रभावी प्रदर्शन, मणिपूर राज्याच्या पारंपरिक थांग-ता युद्धकलेचे तलवार, भाला व ढालींसह सादरीकरण, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून महिलांची छेडछाड व धर्मांधांकडून होणाऱ्या अत्याचारांना प्रतिकार करण्याची वास्तवदर्शी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

दिल्ली

या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते अफजलखान वधाचे रोमांचकारी सजीव चित्रण! पहेलगाम येथील दहशतवादी आक्रमणाला शिवकालीन रणनितीच्या माध्यमातून कसे चोख प्रत्युत्तर देता येऊ शकते, हे स्वसंरक्षणाच्या विविध प्रकारांसह प्रभावीरीत्या मांडण्यात आले. या सादरीकरणामुळे उपस्थित प्रेक्षक थरारून गेले.

मणिपुरी थांग-ता युद्धकलेतील तलवार (थांग), भाला (ता), ढाल आणि युद्धतंत्र यांचे शास्त्रशुद्ध, शौर्यपूर्ण सादरीकरण महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले. कोल्हापूरस्थित ‘सव्यासची गुरुकुलम’ संस्थेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या शौर्यप्रदर्शनात शिवकालीन युद्धतंत्र आणि मराठी शस्त्रपरंपरेचा प्रभावी समन्वय साधण्यात आला. यामध्ये शस्त्रांचा प्रत्यक्ष वापर, संकटसमयी आत्मरक्षण, महिलांवरील छेडछाडीच्या प्रसंगी बचाव, तसेच अनेकांकडून होणाऱ्या आक्रमणाला धैर्याने प्रतिकार कसा करावा, याची सजीव प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यासोबतच ऋषी-मुनींनी सांगितलेल्या सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार, भूमीनमस्कार तसेच विविध पारंपरिक व्यायामप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. या व्यायामपद्धती शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणाऱ्या असून भारतीय संस्कृतीतील आरोग्य व शौर्य यांचा अविभाज्य संबंध अधोरेखित करतात.

यावेळी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते व खासदार सुधांशू त्रिवेदी, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, प. पू. शांतिगिरी महाराज, पू. पवन सिन्हा गुरुजी, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे, सनातन संस्थेच्या उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति अंजली गाडगीळ यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते, असे सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

मोहना कारखानीस यांच्या साहित्यकृतींवर रंगला परिसंवाद

सिंगापूरस्थित मराठी साहित्यिका मोहना कारखानीस यांच्या 'टेक ऑफ' (कथासंग्रह), 'चेहरे, कहाण्या आणि सिंगापूर’ (लेखसंग्रह)) आणि `चंद्रकळा’ (कवितासंग्रह) या पुस्तकांवर आधारित 'पुस्तकावर बोलू काही’ हा परिसंवाद मुंबईतल्या कांदिवलीत मान्यवर साहित्यिक आणि रसिकांच्या उपस्थितीत नुकताच रंगला. त्यांचे साहित्य हे सहज हळूवार भावविश्वांचे प्रतिनिधीत्व करते आणि त्यातून समाजमनाला त्या आपल्या जाणीवांचा...

भारतातल्या २ ते ५ टक्‍के व्‍यक्‍ती हायपरहायड्रोसिसने पीडित

भारतातील २ ते ५ टक्‍के व्‍यक्‍ती हायपरहायड्रोसिसने पीडित असण्‍याचा अंदाज आहे. असे असतानादेखील या स्थितीबाबत जागरूकतेचा अभाव आहे. परिणामत: अनेक व्‍यक्‍तींना या वैद्यकीय स्थितीबाबत माहित नाही आणि ते नकळतपणे आजार सहन करतात. वेळेवर उपचार न केल्‍यास या आजाराचा दैनंदिन...

रविकिरण बालनाट्य स्पर्धेत ‘अडलंय का?’ अव्वल!

सहा दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात अवीट ठसा उमटवत आलेल्या रविकिरण संस्थेची बहुप्रतीक्षित ३९वी बालनाट्य स्पर्धा यंदा अधिक दिमाखात, अधिक उत्साहात आणि अधिक कलात्मकतेने साजरी झाली. ११ व १२ डिसेंबर रोजी मुंबईतल्या यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा...
Skip to content