Sunday, December 22, 2024
Homeन्यूज ॲट अ ग्लांसदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोलांटउडी! 

दारू घोटाळ्यात अडकलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या अटींवर कोणतेही भाष्य न करता जनतेचा कौल मागण्यासाठी आपण मुख्यमंत्रीपद सोडत असल्याचा आव आणत त्यांनी जनतेच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते.

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल जामीनावर सुटल्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत दोन दिवसात आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. दिल्लीची जनता त्याचप्रमाणे भारताची जनता ठरवेल की मी दोशी आहे की नाही? आणि तोपर्यंत मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसणार नाही, अशी घोषणा करत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची वाहवा मिळवली. वस्तुस्थिती अशी आहे की, त्यांना जामीन याच मुद्द्यावर मिळाला आहे की, ते मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात जाणार नाहीत, मुख्यमंत्री म्हणून कोणत्याही फायलीवर सही करणार नाहीत, अत्यंत महत्त्वाची अशी जर फाईल असेल तरच त्यावर ते सही करतील. जर जामीन देतानाच न्यायालयाने अशा अटी घातल्या असतील तर ते मुख्यमंत्री म्हणून करणार तरी काय? त्यापेक्षा फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाताना जनतेकडून सहानुभूती मिळवावी असा प्रयत्न केजरीवाल यांनी केला असल्याचे कळते.

आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दोन दिवसांत देत आहोत आणि आपली मागणी आहे की दिल्लीची विधानसभा बरखास्त करावी आणि फेब्रुवारीऐवजी महाराष्ट्राबरोबरच दिल्लीच्याही विधानसभा निवडणुका घ्याव्यात आणि जर आपली मागणी मान्य झाली नाही तर आपल्या जागी कोण असेल हे पक्षाचे विधिमंडळ सदस्य ठरवतील असे त्यांनी जाहीर केले. विधिमंडळ पक्षातले आमदार केजरीवाल यांच्या शब्दाबाहेर नाहीत. त्यामुळे केजरीवाल जो निर्णय घेतील तोच निर्णय सर्व आमदारांचा असेल. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री होण्यासाठी केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य आतिशी सिंग आणि केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे.

अरविंद केजरीवाल यांच्याआधी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तुरुंगात गेल्यानंतर त्यांच्या मंत्रीपदाचा कार्यभार तसेच आम आदमी पार्टीचे इतर मंत्री यांनी जेलवारी केल्यानंतर त्यांच्या मंत्रालयांचे कार्यभार आतिशी यांनीच सांभाळला. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री केजरीवाल तुरूंगात गेल्यानंतर पक्षाची आणि मंत्रिमंडळाची बाजू मांडण्यामध्ये अतिशी यांचा मोठा सहभाग होता. मात्र याच काळात अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता याही घराबाहेर पडल्या आणि त्यांनी जाहीर सभांमध्ये भाषणे देण्यास सुरुवात केली. अरविंद केजरीवाल यांचे वजन कसं कमी होत आहे, किती ग्रामने कमी होत आहे. त्यांना डायबिटीस असताना कसं गोड खायला दिलं जात आहे, अशा पद्धतीचे आरोप करण्यामध्ये सुनीता केजरीवाल यांचा मोठा सहभाग राहिला आहे.

त्यामुळेच जर मुलायमसिंग यादव, लालूप्रसाद यादव, हेमंत सोरेन अशा काही मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल ठेवत पुढे जायचं असेल तर अरविंद केजरीवाल येत्या दोन दिवसांत सुनिता केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवतील किंवा पुढच्या पाच वर्षांची बेगमी करण्यासाठी म्हणजे फेब्रुवारीच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी ते सुनिता केजरीवालना टाळून पक्षातल्या इतर कोणत्यातरी नेत्याला मुख्यमंत्री बनवतील असे जाणकारांचे मत आहे.

Continue reading

कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा ‘आता थांबायचं नाय’!

बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं...

परभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही न्यायालयीन चौकशी

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता. विधानसभेत या विषयावर गेले दोन...

सन्मित्र क्रीडा मंडळ अजिंक्य

मुंबईत कांदिवली येथे झालेल्या मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या ४२व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभागाच्या द्वितीय श्रेणी पुरुष गटात सन्मित्र क्रीडा मंडळ, घाटकोपरने जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सन्मित्रने साई स्पोर्ट्स क्लब, भांडूप यांच्यावर ७ गुणांनी विजय मिळवला. सन्मित्र...
Skip to content