Homeएनसर्कलखाद्यतेलाच्या दरात घसरण,...

खाद्यतेलाच्या दरात घसरण, ग्राहकांना होणार फायदा?

ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत खाद्यतेलाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने खाद्यतेलांवरील मूलभूत आयात शुल्क कमी केले आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने यासंबंधीचा आदेश 14 जून 2023 रोजी अधिसूचना क्रमांक 39/2023 – सीमाशुल्क द्वारे जारी केला होता. यात रिफाईन्ड सोयाबीन तेल (एचएस कोड 15079010) आणि रिफाईन्ड सूर्यफूल तेल (एचएस कोड 15121910) वरील मूलभूत आयात शुल्क आजपासून 17.5% वरून 12.5% पर्यंत कमी केले आहे.  हे दर 31 मार्च 2024पर्यंत लागू राहील. याचा ग्राहकांना कितपत फायदा होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी सरकारने केलेल्या पूर्वीच्या उपाययोजनांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. मुलभूत आयात शुल्क हा खाद्यतेलांच्या किमतीवर  परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत किमतींवर होतो. रिफाईन्ड सूर्यफूल आणि  सोयाबीन तेलावरील आयात शुल्कात कपात केल्याने ग्राहकांना फायदा होईल. कारण यामुळे देशांतर्गत किरकोळ किमती कमी होण्यास मदत होईल.

रिफाईन्ड सोयाबीन तेल आणि  सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क ऑक्टोबर 2021 मध्ये 32.5% वरून 17.5% पर्यंत कमी करण्यात आले होते. 2021 या वर्षात खाद्यतेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती खूप जास्त होत्या देशांतर्गत किमतींवरही त्याचे परिणाम होत होते.

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग, ग्राहक व्यवहार मंत्रालय, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग देशातील खाद्यतेलाच्या किमतींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि ग्राहकांना त्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करत आहे.

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content