Homeडेली पल्सआदित्य ठाकरेंचे लग्न...

आदित्य ठाकरेंचे लग्न लावायला उपमुख्यमंत्री फडणवीस तयार…

कोणाचेही तोंड बंद करायचे असले तर त्याचे लग्न लावून देणे, हा प्रभावी उपाय आहे, असं उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं आणि तसं सांगतानाच मी स्वानुभवातून सांगतोय, असं म्हणून पुन्हा हंशा वसूल केला.

नाशिकमधील आमदार सरोज अहिरे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर राज्यातील जुने वीजनिर्मिती प्रकल्प, त्यांचा आपत्कालीन परिस्थितीत होणारा वापर, त्यातून उद्भवणारे प्रश्न, याची चर्चा सुरू होती. ती होताना आमदार बच्चू कडू यांनी उपरोधिकपणे प्रश्न विचारला की, प्रकल्प उभा करायचा, जुना झाला तरी चालवायचा म्हणजे लग्नही सरकारने लावायचे आणि पुढची जबाबदारीही सरकारनेच घ्यायची, असं आहे का? त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी नागपूरमध्ये वीजप्रकल्पांतून निघणाऱ्या राखेच्या तलावाशी संबंधित काही उपप्रश्न विचारले.

फडणवीस

त्यावर उत्तर देताना फडणवीस मिष्किलपणे म्हणाले की, बच्चू कडू यांनी बहुधा हा प्रश्न आदित्य ठाकरे यांच्याकडे बघत बघत विचारला असे मला वाटतेय… तर मी सांगू इच्छितो की, आम्ही लग्न लावून द्यायची जबाबदारी घेतो… त्यावर आदित्य ठाकरे उठून म्हणाले की, लग्न लावून देतो, पण आमच्या बाजूला या, अशी ही धमकी तर नाही ना… त्यावर फडणवीस म्हणाले की, एखाद्याचे तोंड बंद करायचे असले की…

ते वाक्य फडणवीस यांनी अर्धवट सोडून दिले आणि सभागृहात हंशा उसळला. त्यावर फडणवीस यांनी लगेच टिप्पणी केली. अहो, मी स्वानुभवातूनच सांगतोय हे… ते असे म्हणताच सभागृहात पन्हा हास्यकल्लोळ उडाला.

Continue reading

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....

वाटाणा वाटाणा पे लिखा है `खाने’वाले का…

वाटाण्यावाटाण्यात काय फरक असणार, असे कोणी विचारले तर हा प्रश्न निरर्थक मानू नका. हिरव्या आणि पांढऱ्या वाटाण्यात फरक असतो आणि या फरकातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही सरकारवर होऊ शकतो, हे मंगळवारी राज्याच्या विधानसभेत दिसून आले. आमदार कैलास घाडगे-पाटील...

मुनगंटीवार वन्स अगेन!

सरकारी काम म्हणजे सहा महिने थांब... असं कायम म्हटलं जातं आणि नेमका त्याचाच अनुभव राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आल्याचे गुरुवारी राज्याच्या विधानसभेत स्पष्ट झाले. सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आपल्या वृद्ध पालकांची तसेच कुटुंबातील दिव्यांग व्यक्तींची जबाबदारी घ्यावी, याची...
Skip to content