Homeटॉप स्टोरी"तौते" चक्रीवादळाचा महाराष्ट्राचा...

“तौते” चक्रीवादळाचा महाराष्ट्राचा धोका टळला!

“तौते” हे चक्रीवादळ अरबी समुद्रावर आग्नेय भागाशी संलग्न मध्यपूर्व भागातून उत्तर-वायव्य दिशेला सरकत असून त्याचा महाराष्ट्राला असलेला धोका जवळजवळ टळला आहे.

गेल्या सहा तासांत ताशी 11 किमी वेगाने त्याची वाटचाल झाली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज 15 मे 2021 रोजी सकाळी  8.30 वाजता त्याचे स्थान 12.8° उत्तर अक्षांश आणि 72.5°पूर्व रेखांशाजवळ होते. हे ठिकाण अमीनदीवी बेटापासून सुमारे 190 किमी उत्तर-वायव्य, पणजीच्या दक्षिण-नैऋत्येला 330 किमी आणि गुजरातमधील वेरावळपासून 930 किमी तसेच पाकिस्तानमधील कराचीपासून 1020 किमीवर होते.

पुढील सहा तासांत या चक्रीवादळाचे रुपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची आणि त्यापुढील 12 तासांत अतिजास्त तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. ते उत्तर-वायव्य दिशेला सरकण्याची खूपच जास्त शक्यता असून 18 मे रोजी ते दुपारी किंवा संध्याकाळी गुजरातमध्ये पोरबंदर आणि नलियादरम्यानची किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.

यामुळे हवामान खात्याने पुढील गोष्टींचा इशारा दिला आहे.

(i) पाऊस: कोकण आणि गोवाः 15 मे रोजी दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची आणि उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची आणि 16 मे रोजी कोकण आणि गोवा आणि घाटमाथ्याला जोडणाऱ्या काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची आणि 17 मे रोजी उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

(ii) वाराः 15 मे रोजी दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीवर ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची आणि त्यांचा वेग 60 ते 70 किमीपर्यंत वाढण्याची आणि 16 मे रोजी 60 ते 70 किमी वेगाने आणि त्यानंतर त्यापेक्षा जास्त 80 किमीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. 

(iii) समुद्राची स्थिती: 15 आणि 16 मे रोजी महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीवर समुद्र खवळलेला राहील. 

(iv) मच्छिमारांना इशारा: या काळात महाराष्ट्र, गोवा, केरळ, कर्नाटक आणि लगतच्या किनारपट्टीवरील मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. जे मच्छिमार उत्तर अरबी समुद्रात आहेत त्यांना परत फिरण्याची सूचना करण्यात आली आहे. 

(v) हानीची शक्यताः गुजरातमध्ये देवभूमी, द्वारका, कच्छ, पोरबंदर, जुनागढ, गीर, सोमनाथ आणि जामनगर जिल्ह्यांत हानी होण्याची शक्यता आहे.

कच्च्या आणि मातीच्या घरांना धोका असून जोरदार वाऱ्याने घरांची छपरं उडून आणि हवेतून येणाऱ्या इतर वस्तूंमुळे हानीची भीती आहे. वीजेचे खांब आणि वाहिन्यांनादेखील धोका आहे. रेल्वेमार्गांनादेखील किरकोळ धोका संभवतो. मिठागरे आणि तयार पिके तसेच झुडुपांची हानी होण्याची आणि झाडे उन्मळून पडण्याची शक्यता आहे. 

(vii) उपाययोजना: मासेमारी पूर्ण थांबवावी, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे तर्कसंगत नियमन करावे. वादळाचा धोका असलेल्या भागातील लोकांनी घराबाहेर पडू नये. जलवाहतूक करू नये.

(Please CLICK HERE for details in graphics)

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content