Homeकल्चर +दादर-माटुंगा केंद्रातर्फे ऑक्टोबरमध्ये...

दादर-माटुंगा केंद्रातर्फे ऑक्टोबरमध्ये तबलावादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने शनिवार, ११ ऑक्टोबर २०२५, यादिवशी सकाळी ९.३० वाजता तबलावादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा अव्यावसायिक कलाकारांसाठी आहे. स्पर्धा १६ ते २५ वर्षे या मोठ्या वयोगटासाठी ९.३० वाजता तर १० ते १५ वर्षे, या छोट्या वयोगटासाठी दुपारी ३ वाजता होईल.

अधिकाधिक स्पर्धकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा- ०२२-२४३०४१५०, www.dadarmatungaculturalcentre.org

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

सी.पी. राधाकृष्णन भारताचे १५वे उपराष्ट्रपती!

महाराष्ट्राचे कालपर्यंतचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज दिल्लीत भारताचे १५वे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधीच्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना अधिकारपदाची तसेच गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधीनंतर राधाकृष्णन यांनी महात्मा गांधींच्या समाधीला...

अमूल, ब्रिटानिया, डाबरच्या वस्तू होणार स्वस्त

येत्या २२ सप्टेंबरपासून संपूर्ण देशात जीएसटीचे दोनच टप्पे (५ आणि १२ टक्के) अस्तित्त्वात येणार असल्यामुळे अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी होणार आहे. या कमी होणाऱ्या कराचा लाभ थेट ग्राहकांना देण्यासाठी काही कंपन्यांनी पुढाकार घेतला असून त्यात अमूल, ब्रिटानिया, कोका-कोला, डाबर,...

आयआयएम अहमदाबादची दुबईतली पहिली शाखा सुरू

भारतातली आघाडीची व्यवसाय शिक्षण संस्था असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) अहमदाबादच्या पहिल्या परदेशी शाखेचे (campus) उद्घाटन काल दुबईचे युवराज, उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री, शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन समारंभाला भारताचे ...
Skip to content