Homeब्लॅक अँड व्हाईटनेहा म्हणते- कामे...

नेहा म्हणते- कामे वाटून घेणारी जोडपी अधिक आनंदी!

प्रथमच 100 घरगुती मदतनीस अभिनेत्री नेहा धुपियासह एकत्र आले आणि त्यांनी घरांतील असमानता व त्याचे नात्यावर होणारे परिणाम याबद्दलची निरीक्षणे मांडली. जी जोडपी कामे वाटून घेतात ती अधिक आनंदी असतात, असे 95% घरगुती मदतनिसांनी सांगितले. नवरा घरातील कामांमध्ये मदत करत नसल्यामुळे जोडप्यांमधील संवाद कमी होतो या मताशी 85 टक्क्यांहून अधिक घरगुती मदतनिसांनी सहमती दर्शवली. अनेक कुटुंबामध्ये घरगुती मदतनीस हे कुटुंबाचाच विस्तारित भाग असतात आणि जोडप्यांमधील नाते काळाच्या ओघात कसे उत्क्रांत होत जाते याचे साक्षीदारही असतात.

जोडपी

अभिनेत्री नेहा धुपिया यांच्यासह 100 घरगुती मदतनिसांनी, अशा प्रकारच्या पहिल्याच समारंभात, कुटुंबातील समानता व असमानतेच्या खुणा व त्याचा नात्यावर होणारा परिणाम, यांचा शोध घेतला. घरगुती मदतनीस हे अनेक कुटुंबांचा विस्तारित भाग असतात. जोडप्यांमधील आंतरक्रियांचे ते साक्षीदार असतात आणि कालांतराने नाते कसे बदलते याबद्दल बाह्य दृष्टिकोन ते पुरवतात. कामाच्या विभागणीतील समानतेमुळे जोडपी एकमेकांच्या जवळ येतात, तर असमानतेमुळे भावनिक दुरावा निर्माण होतो, असे संशोधनातून दिसून येते.

भारतीय अभिनेत्री व मॉडेल नेहा धुपियाने या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. कुटुंबातील समानता व असमानतेच्या खुणांवर तिने 100 घरगुती मदतनिसांसोबत सखोल चर्चा केली. हा समारंभ एरिअलच्या अभियानाचा भाग होता. घरगुती कामांतील असमान वाटपाचा नातेसंबंधांवर दीर्घकाळात कसा परिणाम होतो ह्यावर प्रकाश टाकण्याच्या तसेच पुरुषांना कामे वाटून घेण्याचे आव्हान करण्याचा उद्देश या अभियानामागे आहे.

उपस्थित घरगुती मदतनिसांची निरीक्षणे व त्यांच्या दृष्टिकोनातून माहिती जाणून घेण्यासाठी एक थेट सर्वेक्षण घेण्यात आले. पती घरगुती कामात रस घेतो आणि मदत करतो, तेव्हा ते जोडपे अधिक आनंदी असते असे निरीक्षण 95% घरगुती मदतनिसांनी नोंदवले. जेव्हा पती आणि पत्नी घरातील कामांचे समान वाटप करत नाहीत तेव्हा वैवाहिक नात्यात दुरावा निर्माण होतो असे 80 टक्क्यांहून अधिक मदतनिसांनी नमूद केले. घरातील कामे सारखी वाटून घेतल्यामुळे कोणा एकावर ताण किंवा बोजा येत नाही आणि त्यामुळे सहवास तसे आनंदाची भावना वाढील लागू शकते, असेही घरगुती मदतनिसांनी सांगितले. पती घरगुती कामात मदत करत नसेल, तर जोडप्यांमधील संवाद कमी होत जातो, या मताशी 85 टक्क्यांहून अधिक घरगुती मदतनिसांनी सहमती दर्शवली. घरगुती कामांमधील वितरण असमान असेल तर कालांतराने दोघांपैकी एक जण तटस्थ होऊन जातो आणि नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो.

अभिनेत्री नेहा धुपिया म्हणाली की, 100 घरगुती मदतनिसांसोबत ह्या सत्राचे सूत्रसंचालन करणे हा खूपच नवीन माहिती देणारा अनुभव होता. या सत्रात मदतनिसांनी त्यांची निरीक्षणे व अनुभव सर्वांपुढे मांडले. घरगुती मदतनीस नातेसंबंधांबद्दल व काळाच्या ओघात ते कसे बदलतात याबद्दल एक त्रयस्थ दृष्टिकोन देऊ शकतात. आम्ही ज्या निष्कर्षांप्रत आलो, ते धक्कादायक होते पण त्यातून घरातील कामे वाटून घेण्याच्या महत्त्वावर प्रकाशही टाकला गेला. घरातील कामे लिंगावर अवलंबून नसतात. ते ‘त्याचे’ किंवा ‘तिचे’ काम नसते, तर आपले आयुष्य असते आणि आपल्या सामाईक जबाबदाऱ्या असतात. ही कामे वाटून घेऊन पती पत्नीवरील बोजा कमी करू शकतो आणि त्यांच्यातील नाते दृढ करून अधिक सौहार्दपूर्ण कुटुंब निर्माण करू शकतो. पारंपरिक लिंगाधारित भूमिकांच्या चौकटीतून बाहेर पडण्याची आणि आपल्या घरात समान सहयोगाची संस्कृती निर्माण करण्याची वेळ आली आहे. घरात जर सतत असमानता असेल तर त्यातून नात्यांमध्ये भावनिक दुरावा निर्माण होऊ शकतो. याच्या खुणा ओळखून कामे वाटून घेण्याचे आवाहन मी सर्वांना करते.

पीअँडजी इंडियाचे प्रमुख मार्केटिंग अधिकारी आणि पीअँडजी भारतीय उपखंडाच्या फॅब्रिक केअरचे उपाध्यक्ष शरत वर्मा म्हणाले की, एरिअलमध्ये आम्हाला सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी उपयुक्त अशी अर्थपूर्ण संभाषणे सुरू करण्याची इच्छा आहे. यंदा आमच्या य़ा अभियानाच्या माध्यमातून, आम्ही असमानतेच्या खुणा व त्यांचा नात्यांवर होणारा परिणाम ओळखण्याचे आवाहन सर्वांना करत आहोत. यात आणखी खोलवर जाण्याच्या उद्दिष्टाने, आम्ही घरातील नातेसंबंधांकडे त्रयस्थ दृष्टीने बघणाऱ्या घरगुती मदतनिसांना, जोडप्यांमध्ये दिसणाऱ्या समानता व असमानतेच्या खुणांवर मते मांडण्यासाठी, आमंत्रित केले. पती घरकामात रस घेतो आणि मदत करतो, तेव्हा ते जोडपे अधिक आनंदी असते असे निरीक्षण 95% मदतनिसांनी नोंदवले. जेव्हा घरातील कामे पती आणि पत्नींमध्ये सारखी वाटली जात नाहीत, तेव्हा वैवाहिक नात्यात दुरावा निर्माण होतो, असे 80 टक्क्यांहून अधिक घरगुती मदतनिसांनी नमूद केले. न्याय्य व आनंदी वैवाहिक आयुष्यासाठी प्रत्येकाने काही क्षण विचार करावा, आत्मपरीक्षण करावे आणि खुणांकडे लक्ष द्यावे असे आवाहन हा दृष्टिकोन करतो. एक स्वतंत्र त्रयस्थ यंत्रणा आणि आमचे माहिती सहयोगी “नेपा” ह्यांनी सर्वेक्षणातील निरीक्षणांवर शिक्कामोर्तब केले आहे.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content