Homeएनसर्कलहरित तंत्रज्ञानावर आधारित...

हरित तंत्रज्ञानावर आधारित देशातले पहिले वातानुकूलन संयंत्र नौदलात कार्यान्वित!

नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल आर हरी कुमार यांनी आयएनएस शिवाजी येथे कार्बनडायऑक्साईड आधारित अनोख्या वातानुकूलन संयंत्राचे नुकतेच उद्‌घाटन केले. जहाजावरील एचएफसी (हायड्रो फ्लुरो कार्बन) आणि एचसीएफसी (हायड्रो क्लोरो फ्लुरो कार्बन) आधारित वातानुकूलन प्रणालीच्या जागी हे वातानुकूलन संयंत्र बसवण्यात येणार असून अशाप्रकारचे हे पहिलेच संयंत्र आहे.

हे पाऊल 2028पासून एचएफसी आणि एचसीएफसी आधारित कृत्रिम प्रशीतक कमी करण्याच्या 2016च्या किगाली कराराप्रती भारताच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने असून ट्रान्सक्रिटिकल CO2 आधारित वातानुकूलन संयंत्र हे त्या दिशेने पहिले पाऊल आहे. हे तंत्रज्ञान हवामान बदलाचा मुकाबला करण्याच्या जागतिक प्रयत्नांशी मिळतेजुळते असून शाश्वत हरित पर्यायांच्या दिशेने भारतीय नौदलाच्या पुढाकाराला समर्थन देते.

हे वातानुकूलन संयंत्र प्रगत डिजिटल नियमन प्रणाली आणि स्मार्ट तंत्रज्ञान संकलनाद्वारे किफायतशीर मनुष्यबळात संयंत्र चालवण्यासाठी सुसज्ज आहे. ही प्रणाली बंगलोरमधील आयआयएससीच्या सहकार्याने विकसित केली गेली आहे, जी सशस्त्र दलांमध्ये भविष्यकालीन तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या दिशेने संरक्षण-प्रशिक्षण समन्वय सुरळीत करण्याचा पुरावा आहे. या तंत्रज्ञानाच्या यशामुळे नौदलाला केवळ अत्याधुनिक यंत्रसामग्रीच उपलब्ध होणार नाही तर व्यावसायिक वातानुकूलन आणि प्रशीतन बाजारात त्याचा व्यापक वापर करण्याची क्षमता आहे.

उद्‌घाटन समारंभाला आयएनएस शिवाजीचे प्रमुख कमोडोर मोहित गोयल, प्रा. बी गुरुमूर्ती, सीईओ, एफएसआयडी, आयआयएससी बंगलोर, टाटा कन्स्लटिंग इंजिनिअर्स लिमिटेडचे एमडी, सीईओ अमित शर्मा आणि बंगलोरच्या त्रिवेणी टर्बाइन्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक अरुण मोटे हेदेखील उपस्थित होते.

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content