Homeमुंबई स्पेशलविधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावर...

विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर विधानसभेतले विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे घेण्यासाठी काँग्रेस सरसावली असून ही माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक मोठा गट सरकारमध्ये सहभागी झाला. त्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ घटले आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या म्हणण्यानुसार आता 19-20 आमदार त्यांच्या बाजूला आहेत. काँग्रेसचे विधानसभेत 44 सदस्य आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून उद्या अधिवेशन सुरू होताच विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला जाईल. विधिमंडळ काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तसेच माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि ज्येष्ठ सदस्या यशोमती ठाकूर या सर्व नेत्यांकडून विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगितला जात आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नावदेखील चर्चेत आहे. या साऱ्यावर काँग्रेसचे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे उद्या स्पष्ट होईल.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content