Homeमुंबई स्पेशलआता मुंबईत कचर्‍याची...

आता मुंबईत कचर्‍याची तक्रार पाठवा थेट व्हॉट्सॲपवर!

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात, सार्वजनिक ठिकाणच्या कचऱ्याच्या तक्रारींचे निराकरण व्हावे, कचऱ्याबाबत नागरिकांना तक्रार अथवा सूचना नोंदवता यावी, यासाठी पालिकेने 8169681697 हा व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. याद्वारे घनकचराविषयक तक्रारींच्या निर्मुलनाकरीता एक थेट व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कालपासून ही सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे.

पालिकेतर्फे मुंबई महानगर स्वच्छ आणि सुंदर राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. पाणी, आरोग्य, शिक्षण या नागरी सेवासुविधांसोबत सार्वजनिक रस्त्यांच्या स्वच्छतेची सेवादेखील पालिकेच्या वतीने पुरविली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून, मुंबई महानगरात घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी नागरिकांसाठी थेट संपर्क सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार, पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याने ही नवीन व्हॉट्सॲप चॅटबॉट सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात घनकचराविषयक नागरिकांच्या तक्रारींसाठी 8169681697 हा व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर नागरिकांना कचरा न उचलणे, रस्ता स्वच्छ नसणे व मृत जनावरे उचलणे, या तक्रारीसंबंधीचे थेट छायाचित्र पाठवता येणार आहे. नागरिकांनी छायाचित्रासह, त्या ठिकाणाचा पत्ता / जीपीएस लोकेशन शेअर करणे आवश्यक आहे. ही तक्रार 8169681697 या व्हॉट्सॲप चॅटबॉटवर नोंदणीकृत झाल्यानंतर, ती तक्रार संबंधित विभागाकडे थेट जाणार आहे. त्यामुळे सध्या तक्रार निर्मुलनाकरीता लागणारा वेळ लक्षणीयरित्या कमी होणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित घनकचरा व्यवस्थापन अधिकारी या तक्रारीचे निश्चित केलेल्या वेळेत निर्मूलन करुन, त्याठिकाणचे छायाचित्र अपलोड करतील. परिणामी नागरिकांना त्वरित तक्रार निर्मूलन केल्याचे प्रमाण मिळणार आहे. मुंबईकरांनी पालिकेच्या या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content