Homeमाय व्हॉईसजिल्हाधिकारी साहेब, हा...

जिल्हाधिकारी साहेब, हा घोडबंदर रस्ता सुस्थितीत? 

खरे तर ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिणगारे यांच्याबद्दल चांगलेच ऐकलेले होते. परंतु हाताखालचे अधिकारी बचाव करण्याच्या नादात घटनांचा कसा चुकीचा अर्थ लावतात, याचा अनुभव सकाळी सकाळीच वर्तमानपत्र वाचताना आला. काही दिवसांपूर्वी घोडबंदर रस्त्यावर एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू रस्त्यातील खड्ड्यामुळे झाला असा आरोप करून संबंधितानी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. या आरोपाचे खंडन करताना हा मृत्यू खड्ड्यामुळे झाला नसून ट्रकचालकाच्या चुकीमुळे झाल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले. परंतु त्याला जोडूनच घोडबंदर रस्ता सुस्थितीत असल्याचे जे विधान करण्यात आले आहे त्याने तमाम ठाणेकरांचा अपमानच झाला आहे.

वास्तविक हा मृत्यू खड्ड्यामुळे झाला नाही इतकेच सांगून हा विषय संपवता आला असता. परंतु राजकीय नेत्याप्रमाणेच शायनिंग मारायची सवय अनेक कनिष्ठ अधिकाऱ्यांना लागलेली असल्याने जिल्हाधिकारी त्याला नाहक फशी पडले, असे दिसत आहे. खरे तर घोडबंदर रस्ताच काय, ठाण्यातील अनेक रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आम्ही स्वतः नको ते ‘दुखवून’ घेतलेले आहे.  आता घोडबंदर रस्तापुराण चालू आहे, म्हणून थोडावेळ तेथे फोकस करू. या विवियाना मॉलपासून थोड्या अंतरावर घोडबंदर रस्ता सुरू होतो. रस्त्याच्या सुरुवातीलाच गाडीत बसलेल्या (साधी गाडी, एसयुव्ही नव्हे) जर्क बसायला सुरुवात होते. हे जर्कचे सत्र संपत नाही, कारण अनेक ठिकाणी दुरुस्त केलेला रस्ता ‘समतल’च केलेला नाही. भारतीय जनता पार्टीचे स्वर्गीय नेते रामदास नायक अशा प्रकाराला रस्त्याला ‘टेंगूळ’ आले असे म्हणत असत.

हे रस्त्याचे झाले. तेथे उभारलेल्या उड्डाणपुलावर तर सुरुवातीपासूनच जर्क बसायला सुरुवात होते. माजिवडा येथे खाली येणारा पुलाचा भाग आहे. तेथेही लक्ष देण्याची गरज आहे. पुन्हा खाली रस्त्यावर आले की जवळच असलेल्या पेट्रोल पंपापासून पुन्हा रस्ता खराब होण्यास सुरुवात होते. तेथे आणखी पुढे गेल्यास एका पिझ्झाच्या हॉटेलपाशी तर गेल्या सहा महिन्यांपासून जीवघेणी वाहतूककोंडी होत असते व जनता ती मुकाट्याने सहनही करत आहे. त्यानंतर मानपाडा येईपर्यंत छोटेमोठे खड्डे आहेतच. केवळ गायमुखपासून रस्ता थोडाफार ठीक आहे. पुन्हा फाऊंटन हॉटेल परिसरात परत दुष्टचक्र सुरू होते. येथील रस्ते खराबच आहेत.

आता थोडक्यात ठाण्यातील इतर रस्त्यांबाबत गोकुळ नगरच्या उड्डाणपुलाखालील रस्ता, टेंभी  नाका परिसर, त्याच्या आतील रस्ते, अवघ्या काही महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या नवीन उड्डाणपुलावर जातानाच जोर का झटका लागतो. हा सिलसिला काही मिनिटे सुरूच असतो. ठाण्याकडे येतानाही या पुलावर जर्क बसतातच. पाच पाखाडी सेवा रस्ते, खोपट, भास्कर कॉलनीचा काही भाग, कोपरी बस थांबा परिसरात अगदी शेवटपर्यंत गेल्यास बकवास कामाचा अनुभव येतोच. “No pain, no gain thus often of road construction” असेच म्हणण्यासारखी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी आहे. परंतु सरकार, स्थानिक प्रशासन तसेच सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की, “Roads are the veins of society and their construction is the pulse of progress”. राजकीय नेत्यांपेक्षा नोकरशाहीने हे अधिक लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या सुनावणीच्या वेळी सरकारतर्फे रस्ते चांगले ठेवायची सरकारतर्फे हमी दिली गेली. परंतु हे रस्ते वारंवार खराब का होतात याची मात्र कारणमिमांसा तपशीलात जाऊन केली गेली नाही, असेच वाटतं…

Continue reading

लांब जटा.. टिळा-टोपी-माळा, अशा प्रतिमेला छेद देणारा भोंदू!

कॅप्टन नसलेल्या आणि इयत्ता दहावी नापास असलेल्या अशोक खरात नामक भोंदूबाबाच्या विविध कथांनी राज्यातील वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने सध्या भरून वाहत आहेत! तसे पाहिले तर आपल्या राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला बुवाबाजींनी ग्रासलेले आहे. कुठे आसाराम आहेत तर कुठे बाबा...

सत्यमेव जयते!

अलीकडे आपल्या सार्वजनिक व खासगी बँकामधील गैरप्रकारांची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. भविष्यात आणखीही येण्याची शक्यता आहे. आपल्याकडे अशा सर्व प्रकरणाची एक खासियत आहे की, बँकेचे संबंधित अधिकारी वा संबंधित व्यवसायिक एकदा का न्यायालयात गेले की न्यायांचे 'दळण' सुरु...

वर्णमुद्राचे ‘मोहोळ’- कौशल्य सारे रचनेत आहे!

ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले 'मोहोळ' हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती भेटल्या आणि 'भिडल्या' त्यांचे व्यक्तीचित्रण या पुस्तकात रेखाटलेले आहे. 'मोहोळ' वाचताना काही माणसांच्या आयुष्यात आपण...
Skip to content