Homeमुंबई स्पेशलमुंबई विमानतळावर 15...

मुंबई विमानतळावर 15 कोटींचे कोकेन जप्त!

महसूल गुप्तचर संचालनालयानं [The Directorate of Revenue Intelligence (DRI)] अंमली पदार्थांची तस्करी रोखण्याच्या मोहीमेअंतर्गत मोठं यश मिळवलं आहे. डीआरआयने १८ ऑगस्ट २०२३ रोजी केलेल्या कारवाईत आदिस अबाबाहून ET 640 या विमानाने मुंबईत आलेल्या एका भारतीय प्रवाशाकडून 1496 ग्रॅम इतका कोकेनचा साठा जप्त केला. याचे अंदाजीत बाजारमूल्य 15 कोटी रुपये इतके आहे.

डीआरडीआयला याबाबत आधीपासूनच माहिती असल्याने, सातत्यपूर्ण चौकशी आणि पाळत ठेवली गेली होती. त्यानंतर अमली पदार्थांची  तस्करी रोखण्यासाठी ही नियोजनपूर्वक कारवाई केली गेली. या प्रवाशाच्या हालचाली संशस्पद वाटल्याने, विमानतळावर उतरताच डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली. यात त्याच्याकडे कोकेनचा साठा सापडला. हे प्रतिबंधित अमली पदार्थ ज्या व्यक्तीला दिले जाणार होते त्या महिलेला अटक करण्यातही संचालनालयाला यश आले आहे. अटक केलेली महिला ही युगांडाची नागरिक असून, नवी मुंबईत, वाशी इथे तिला अटक केल्याचे डीआरआयने कळवले आहे.

हे अमली पदार्थ आणणाऱ्या आणि ते मागवणाऱ्या दोघांनाही अमली आणि मादक पदार्थ प्रतिबंध कायदा १९८५ मधील तरतुदींनुसार अटक केल्याचं डीआरआयने कळवलं आहे. पुढच्या कायदेशीर कारवाईसाठी या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Continue reading

ट्विटने युद्ध थांबवता येत नाही! इराणने ट्रम्पना सुनावले!!

युद्ध सुरू करणे सोपे आहे. ट्विटने ते थांबवता येत नाही. अमेरिकेला याची किंमत मोजावीच लागेल, अशा शब्दांत इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काल रात्री सुनावले. कालच इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह मोजतबा खामेनेई...

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी...
Skip to content