Friday, October 18, 2024
Homeमुंबई स्पेशलमुंबईतल्या घाटकोपर परिसरातल्या...

मुंबईतल्या घाटकोपर परिसरातल्या पाण्याच्या वेळेत बदल

बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘एन’ विभागातील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयाच्या कप्पा क्रमांक १ व २च्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्‍यामुळे एका कप्‍प्‍यातून पाणीपुरवठा केला जात आहे. हा पाणीपुरवठा सुरळीत होण्‍यासाठी काही भागांच्‍या पाणीपुरवठ्याच्‍या वेळांमध्‍ये बदल करण्‍यात आला आहे. नागरिकांनी या बदललेल्‍या वेळापत्रकाची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयाच्या कप्पा क्रमांक २चे दुरूस्तीचे काम २४ ऑगस्‍टपासून सुरू झाले आहे. जलाशयाच्‍या दोन्ही कप्प्यांचे काम २० महिने (पावसाळा वगळता) सुरू राहणार आहे. या कालावधीमध्‍ये पाणीपुरवठा एका कप्प्यातून केला जात आहे. या कारणाने पाणीपुरवठा सुरळीत होण्याकरीता खालील ठिकाणी पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

१) पाणीपुरवठा झोन– नारायण नगर

आधीची पाणीपुरवठ्याची वेळ- दुपारी  ०३.१५ ते सायंकाळी ०७.१५

पाणीपुरवठ्याची नवीन वेळ- दुपारी ०२.३० ते सायंकाळी ०५.०० व रात्री १०.४५ ते रात्री ११.३०

विभागांचे नाव

चिराग नगर, आझाद नगर, गणेश मैदान, पारशीवाडी, नवीन माणिकलाल इस्टेट, एन. एस. एस. मार्ग, महिंद्रा पार्क, डी. एम. पथ, खलई गाव, किरोल गाव, विद्याविहार पश्चिम, हंसोटी गल्ली, खोत गल्ली, एम. जी. मार्ग, नौरोजी पथ, एच. आर. देसाई मार्ग, कामा पथ, श्रद्धानंद मार्ग, जे. वी. मार्ग, गोपाल गल्ली, जीवदया गल्ली, गीगावाडी.

२) पाणीपुरवठा झोन- पंतनगर आउटलेट

आधीची पाणीपुरवठ्याची वेळ- सायंकाळी ०६.४५ ते रात्री ११.००

पाणीपुरवठ्याची नवीन वेळ- सायंकाळी ०६.१५ ते रात्री १०.३०

विभागांचे नाव

भीमनगर, पवार चाळ, लोअर भीमनगर, क्राईम ब्रँच परिसर, वैतागवाडी, नित्यानंद नगर, धृवराजसिंग मार्ग, सी. जी. एस. कॉलनी, गंगावाडी, एमटीएनएल गल्ली, एजीएलआर मार्ग, एलबीएस मार्ग, घाटकोपर, पश्चिम लगतचा परिसर, श्रेयस सिग्नल इत्यादी.

३) पाणीपुरवठा झोन- सर्वोदय बुस्टींग

आधीची पाणीपुरवठ्याची वेळ- सायंकाळी ०७.१५ ते रात्री ०९.१५

पाणीपुरवठ्याची नवीन वेळ- सायंकाळी ०७.१५ ते रात्री ०९.१५

विभागांचे नाव

सेनिटोरीयम गल्ली, एच. आर. देसाई मार्ग, कामा गल्ली, श्रद्धानंद मार्ग, जे. वी. मार्ग, गोपाल गल्ली, एल. बी. एस. मार्ग लगतचा परिसर, घाटकोपर (पश्चिम), गांधी नगर.

जलाशयाच्‍या एकाच कप्प्यातून पाणीपुरवठा केला जात असल्याने काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. तरी सर्व नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे व पाणी जपून वापरावे, असे आवाहनही पालिकेने केले आहे.

Continue reading

यंदाची विधानसभा निवडणूक बिनचेहऱ्याची!

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगीनघाई सुरू झाली. राज्यातल्या सत्तारूढ महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. मंगळवारी होणारी ही पत्रकार परिषद देशाच्या मुख्य निवडणूक...

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात...

प्रेम, नुकसान आणि उपचार म्हणजेच जिंदगीनामा!

जिंदगीनामा, सोनी लिव्हवरील सहा भागांचा काव्यसंग्रह, शक्तिशाली कथनातून मानसिक आरोग्याच्या गुंतागुंतीचा शोध घेतो, ज्यातील प्रत्येक अद्वितीय आव्हाने हाताळते. मालिका सहानुभूती वाढवण्याचा आणि अनेकदा न बोललेल्या विषयांबद्दल संभाषण वाढवण्याचा प्रयत्न करते. प्रिया बापटसाठी, हा प्रकल्प फक्त दुसऱ्या भूमिकेपेक्षा अधिक होता–...
Skip to content