Homeमुंबई स्पेशलस्टेट बँकेला 80...

स्टेट बँकेला 80 कोटींचा चुना! सीबीआय तपास जारी!

भारतीय स्टेट बँकेच्या मुंबई शाखेने मुंबईस्थित एक खासगी कंपनी, तिचे संचालक, अज्ञात सरकारी कर्मचारी आणि इतर काही व्यक्तींविरुद्ध केलेल्या तक्रारीवरून सीबीआय अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा नोंदवला आहे. या तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की सदर कर्जदार कंपनी आणि तिच्या संचालकांनी बँकेकडून अधिक प्रमाणात कर्ज मिळवण्यासाठी फेरफार केलेली स्टॉक-बुक कर्जविषयक कागदपत्रे, विक्री, उत्पन्न तसेच नफा यांच्या संदर्भातील फुगवलेले आकडे/अतिशयोक्त आर्थिक दस्तावेज सादर करून कर्ज सुविधेचा लाभ घेतला आणि कर्जाची संपूर्ण रक्कम अंतिम कारणासाठी न वापरता इतरत्र वळवली. या व्यवहारातून बँकेला सुमारे 80.73 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणात पुढील आरोपी आहेत : (i)मेसर्स पार्थ फॉईल्स (मे.पीएफपीएल) (ii) मे.पीएफपीएल चा संचालक पार्थ बिजॉय दत्त आणि (iii)अज्ञात सरकारी कर्मचारी तसेच इतर व्यक्ती

मुंबई, गाझियाबाद तसेच हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातल्या बड्डी या ठिकाणासह विविध ठिकाणी राबवलेल्या छापासत्रांमधून काही आक्षेपार्ह कागदपत्रे, संगणकाची हार्ड डिस्क, इलेक्ट्रॉनिक उपकरणे इत्यादी मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

या संदर्भातील अधिक तपशील जाणून घेण्यासाठी कृपया सीबीआयच्या संकेतस्थळावरील ईओबी, सीबीआय मुंबईमध्ये 1 जुलै 2023 या तारखेचा एफआयआर/आरसी क्र. 0682023E0009 तपासावा.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content