भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सध्या एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली हवामानप्रणाली सक्रिय झाली आहे. तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचा एक सलग पाऊसपट्टा या तीन देशांवर पसरला असून हवामानतज्ज्ञांनी याला अत्यंत असामान्य घटना म्हणून संबोधले आहे. साधारणपणे अशा हवामानप्रणाली वक्राकार स्वरूपात आढळतात; मात्र सध्या दिसत असलेला हा पाऊसपट्टा पूर्णपणे सरळरेषीय आहे, जो हवामानशास्त्रात अत्यंत विरळ प्रकार मानला जातो. या सरळरेषीय रचनेमुळे हवामानप्रणाली अधिक केंद्रित आणि तीव्र बनते. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या सरळ संरचनेत वातावरणातील उष्णता आणि बाष्प एकाच दिशेने एकवटत असल्याने मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि गारपीट यांची...
पाकिस्तान सध्या अभूतपूर्व महागाईच्या संकटाचा सामना करत असून, दैनंदिन वापरातील भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. विशेषतः टोमॅटोच्या किमतीने सर्व विक्रम मोडीत काढत लाहोर, कराची...
कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रथमच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने (एनसी) तीन जागांवर विजय मिळवला, तर भारतीय जनता पक्षाने (भाजप) एक...
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आयोगाने 121 सर्वसाधारण निरीक्षक आणि 18 पोलिस निरीक्षकांची नियुक्ती केली असून दुसऱ्या टप्प्यासाठी 122 सर्वसाधारण निरीक्षक आणि 20 पोलिस निरीक्षक नेमले आहेत. तसेच, यादरम्यान सुरू असलेल्या 8 विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांसाठी 8 सर्वसाधारण...
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्र आणि केरळ-कर्नाटक किनाऱ्यावरील लक्षद्वीप क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. पुढील 24 तासांत ते...
भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर...
आयएमडी बुलेटिननुसार, ओदिशा आणि छत्तीसगडच्या काही भागांमधून आणि ईशान्येकडील राज्यांच्या उर्वरित भागातूनही मान्सून माघारला आहे. आतापर्यंत देशाच्या एकूण परतीच्या क्षेत्रापैकी 85 टक्के भागातून मान्सून...
राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण...
मान्सून मुंबईतून पाय काढण्यास नकार का देत आहे आणि रिटर्न मान्सून सुरू न झाल्याने यंदा ऑक्टोबर महिनाही पावसाळीच राहणार का, याबाबत पर्यावरणतज्ज्ञ चिंतित आहेत....
नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा म्हणजे मान्सूनचा प्रवास गेला आठवडाभर खोळंबलेलाच आहे. गेल्या सात दिवसांपासून राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशच्या परतीच्या रेषेवर एकाच जागी मान्सून अडकून पडला...