माय व्हॉईस

स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत, नाशकात भोंदूगिरीचा बाजार!

ज्या नाशिकच्या मातीने सावरकरांसारखा प्रखर बुद्धीप्रामाण्यवादी आणि विज्ञाननिष्ठ महापुरुष जन्माला घातला, त्याच मातीत आज अघोरी विद्येचा, काळ्या जादूचा आणि विकृत भोंदूगिरीचा किळसवाणा बाजार मांडला जावा, ही नियतीची क्रूर थट्टा आहे. सावरकरांनी ज्या अंधश्रद्धेवर आयुष्यभर शब्दांचे वार केले, त्याच अंधश्रद्धेच्या 'दरबारात' आजचे स्वार्थी नेते लोळण घेत आहेत, हे पाहून सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांची आज हत्त्या होत असल्याचे स्पष्ट जाणवते. सावरकरांची रत्नागिरीतील समाजक्रांती आणि विज्ञाननिष्ठेचा वारसा यानिमित्ताने प्रकर्षाने नजरेसमोर येतो. सावरकरांची विज्ञाननिष्ठा केवळ पुस्तकी नव्हती, ती त्यांच्या रक्तातील आक्रमकता होती. रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी जे कार्य केले, ते आजच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे...

पाहा काळाचा महिमा.....

काळाचा महिमा बघा. शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला तर देवेंद्र फडणवीस विनोद तावडे यांच्या घरी! तसे पाहिले तर हे दोन्ही नेते आपापल्या पक्षातले मातब्बर...

शरद पवार: पेटवणारे...

महाराष्ट्राच्या राजकारण शरदश्चंद्र गोविंदराव पवार यांचे मोठे महत्त्व आहे, हे त्यांचे कट्टर शत्रूदेखील मान्यच करतात. आणि साहेबांना जितक्या मोठ्या संख्येने मित्र आहेत, तितक्याच मोठ्या...

‘जय’ हो!

गेली काही वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात मैदानात आणि मैदानाबाहेर भारताचा दबदबा राहिला आहे. भारतीय क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय सामन्यात अनेक शानदार विजय मिळवून स्वतःचे असे...

कामांध समाजमनाने लॉकडाऊनचा...

बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र हादरला होता. या कारणांवरून बदलापूरमध्ये अभूतपूर्व असे आंदोलन झाले होते. राज्यात विरोधी बाकांवर बसणाऱ्या...

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे...

महाराष्ट्रात सध्या विरोधातल्या महाविकास आघाडीकडून सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक कृतीविरूद्ध तसेच घडलेल्या घटनांचा वापर करत विविध प्रकारची आंदोलने केली जात आहेत. मग, सरकारची लाडकी बहीण योजना...

विरोधक तापत ठेवणार...

मालवणच्या किनाऱ्यावरील राजकोट या अगदी लहान किल्ल्यावर उभा केलेला छत्रपती शिवरायांचा 36 फुटी पुतळा अचानक कोसळल्यापासून, जे राजकीय वादळ महाराष्ट्रात उठले आहे, ते शमवण्यासाठी...

निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांचे...

निवृत्तीनंतरचे सरकारी कर्मचाऱ्यांचे हक्क संपले की अबाधित राहिले हा प्रश्न आता सरकारी कर्मचारी संघटनांना पडला असून केंद्र सरकारने अद्यापी त्यांच्या नव्याने सुधारीत एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेचा (युपीएस) शासनआदेश काढलेला नाही....

‘बंद’ला प्रतिबंध करताना...

"काळ्या चष्म्याचे झापड लावलेल्या बुद्धीमंतांच्या धाकात वाढलेल्या जनसामान्यांचे रडणे - ओरडणे, दगड मारणे तुमची झोपमोड करते, तुमचा शृंगार विस्कटते. ग्लोबल कॅनव्हासवर तुमच्या एक्सवायझेड प्रजेचा लढा अस्मितेचा हस्यास्पद वाटतो तुम्हाला, शरमिंदा...

‘बंद’ला प्रतिबंध, पण...

मुंबईशेजारच्या लहान शहरात जी घटना घडली, त्याने राज्याबरोबरच देशही हादरून गेला. विकृत मनोवृत्तीच्या एका नराधमाने छोट्या बालिकांबाबतीत जो प्रकार केला त्याने लोक सुन्न झाले....
Skip to content