स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला.
भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...
मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांनी पश्चिम उपनगरातल्या सांताक्रूज पश्चिम येथील जुहू लायन्स म्युनिसिपल पार्क अर्थात एरोप्लेन गार्डन येथे फळे फुले भाज्यांचे प्रदर्शन आयोजित...
मुंबईच्या भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात म्हणजेच पूर्वीच्या राणीच्या बागेत कालपासून सलग तीन दिवसांचा ‘मुंबई पुष्पोत्सव’ सुरू झाला. मुंबई...
मुंबईतल्या फोर्ट परिसरात सध्या काळा घोडा कलामहोत्सव सुरू आहे. या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी मुंबईसह देशभरातील पर्यटक येत आहेत. यामध्ये मुंबई महापालिकेने अर्थसहाय्य केलेल्या बचतगटांनीदेखील...
मुंबई महापालिकेतर्फे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात म्हणजेच पूर्वीच्या राणीच्या बागेत येत्या ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या तीन दिवसांच्या...
भारतीय प्रजासत्ताकदिनानिमित्त मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलुंडमध्ये पालिकेच्या टी विभाग कार्यालयात फुले आणि झाडांच्या
मदतीने असा विलोभनीय सेल्फी पॉईंट साकारला...
मुंबई महापालिकेच्या सन २०२५-२६च्या अर्थसंकल्पीय अंदाजासाठी पालिका प्रशासनाकडून मुंबईकर नागरिकांना येत्या १७ जानेवारीपर्यंत ई-मेलने अथवा लेखी सूचना पाठविण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी bmcbudget.suggestion@mcgm.gov.in या...
जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी आज, गुरूवारी रात्रीपासून उद्या शुक्रवारी रात्रीपर्यंत मुंबईतल्या जी दक्षिण व जी उत्तर विभागातील काही परिसरात (दादर-प्रभादेवी भागात) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या...
दीपावलीचा मंगलमय सण साजरा करताना नागरिकांनी योग्य दक्षता बाळगावी. दिवाळीत फटाके फोडताना लहान मुलांची जास्त काळजी घ्यावी. फटाके रात्री १० वाजेपर्यंत फोडावेत. या काळात...
मुंबईतल्या पाचही प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी तसेच एसटी आणि शाळांच्या बससाठी माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आज, १४ ऑक्टोबरला...