महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाच्या नगरविकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी गो. श्री. पंतबाळेकुंद्री यांचे काल, सोमवारी ठाण्यात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र अभिजीत आणि विवाहित कन्या तसेच नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी, सकाळी अकरा वाजता ठाण्यातच येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
एकेकाळी मंत्रालयात दोन पंत प्रसिद्ध होते. एक म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशी तर दुसरे म्हणजे पंतबाळेकुंद्री. मनोहर जोशी यांचे 23 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. त्यानंतर काल पंतबाळेकुंद्री निवर्तले. मंत्रालयात नगरविकासासंबंधी कोणताही मुद्दा उपस्थित झाला किंवा चर्चा झाली की सर्वांचा प्रतिसाद एकसुरी...
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी काल सकाळी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली. भारतीय निवडणूक आयोगाने काल 21 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभा निवडणुका 2024मध्ये...
लोकसभा निवडणुकीत मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या चार मतदारसंघांसाठी येत्या २० मे रोजी मतदान होणार असून साधारण ७२ लाख मतदार उमेदवारांचे राजकीय भवितव्य निश्चित करणार आहेत.
या...
अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता ही मतमोजणी 4 जूनऐवजी 2 जूनला होणार आहे.
निवडणूक आयोगाने 16 मार्चला...
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नंदुरबारमधील विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या नंदनवन, या निवासस्थानी शिवसेनेमध्ये प्रवेश केला....
मुंबई महानगराच्या अत्याधुनिक अशा नागरी व्यवस्थापनासाठी थ्री डी मॅपिंग करण्यास सुरूवात झाली आहे. जिओस्पेशिअल तंत्रज्ञानाचा वापर करून हे थ्री डी मॅपिंग (डिजीटल ट्वीन) केले...
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय (ओबीसी) वित्त आणि विकास महामंडळाअंतर्गत संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ, जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास...
पुरूषांइतक्याच सक्षम असूनही आपल्या कार्यक्षेत्रात स्त्रिया अकारण दुय्यम भूमिका स्वीकारताना दिसतात याबद्दल विलेपार्ले पोलीसठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक रेणुका बुवा यांनी नुकतीच खंत व्यक्त केली.
जागतिक महिला...
नवीन तंत्रज्ञान संचालित गतीशीलतेचा अनुभव देण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या किया इंडियाने ४ लाखांपेक्षा अधिक कनेक्टेड कार्सची विक्री करून आणखी एक मैलाचा दगड ओलांडला आहे. किया...
सुसंगत आगाऊ कर जमा न करणाऱ्या व्यक्ती वा संस्थांना 15 मार्चपूर्वी कर जमा करण्यासाठी उद्द्युक्त करण्याकरीता प्राप्तीकर विभागाने ई-मोहिम हाती घेतली आहे.
आर्थिक वर्ष (F.Y.)...