महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांचे काल, सोमवारी रात्री नऊ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नवी मुंबईच्या नेरूळ येथील राहत्या घरी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या संघटनेचे मार्गदर्शक म्हणून ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले. मात्र, राज्य सरकारी कर्माचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न त्यांच्या हयातीत फलद्रूप होऊ शकले नाहीत.
गेल्या ५० वर्षाँच्या संघटनात्मक वाटचालीत त्यांनी विक्रीकर कर्मचारी-अधिकारी संघटना, राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनांचे नेतृत्व करताना विविध पदांची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आहे. राज्य शासनाच्या सेवेतील तब्बल ७२...
कृषी मालाची व्याप्ती वाढवण्यासाठी तसेच शेतकरी आणि व्यापाऱ्यांना डिजिटल व्यापार मंचाचा लाभ घेण्याच्या जास्तीतजास्त संधी उपलब्ध करून देण्याकरीता ई-नाम प्लॅटफॉर्मवरील वस्तूंची संख्येत दहा नव्या...
प्रसिद्ध क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकरने काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात सहकुटूंब भेट घेतली. यावेळी राष्ट्रपती आणि सचिन यांनी अमृत उद्यानातही फेरफटका मारला....
राज्यातल्या उपयोजित कला (अप्लाईड आर्ट) महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून मुंबईतल्या सर ज. जी. कला महाविद्यालयासह महाराष्ट्रात असलेल्या उपयोजित कला महाविद्यालयांतल्या विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण, प्रभावी...
मुंबई महापालिकेचा उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (पूर्वीच्या राणीच्या बागेत) ३१ जानेवारी ते...
आज वसंत पंचमी! माघ महिन्यातील पंचमीला देवी सरस्वती पृथ्वीतलावर अवतरली. त्यामुळे विद्येची देवता सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते. तसेच हा दिवस देवी सरस्वती...
बीआयएस म्हणजेच भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखेने भिवंडीतल्या बेबी कार्ट कंपनीच्या गोदामावर छापा घालून आयएसआय मार्क नसलेली 367 इलेक्ट्रिकल आणि नॉन-इलेक्ट्रिकल खेळणी जप्त केली.
ही...
गोव्याच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, (एनएसडी) येथे उद्यापासून १ फेब्रुवारीपर्यंत भारत रंग महोत्सव, हा भारतीय आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात येत आहे. अभिनेता राजपाल यादव...
मुंबईत २१ ते २५ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या अमर हिंद मंडळ कबड्डी स्पर्धच्या किशोर गटात दादरच्या विजय क्लबने बाजी मारली. महिला गटात डॉ. शिरोडकर...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज, रविवारी मुंबईतल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) नरिमन पॉंईंटकडून उत्तरेकडे जाताना वरळी-वांद्रे सागरी...