Homeन्यूज ॲट अ ग्लांसमतदारांच्या तक्रार निवारणासाठी...

मतदारांच्या तक्रार निवारणासाठी फोन करा- हेल्पलाईन नंबर 1950

निवडणुकीशी संबंधित सर्व शंका/तक्रारींच्या निराकरणासाठीकेंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच “1950” हेल्पलाईन क्रमांकासह देशभरामध्‍ये जिल्हास्तरावर ‘बुक-अ-कॉल विथ बीएलओ’ सुविधा सुरू केली आहे.

याबाबतची संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे-

  1. नागरिकांच्या सर्व शंका/तक्रारींचे निराकरण करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार हेल्पलाईन आणि सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी जिल्हास्तरीय ‘हेल्पलाईन’ सक्रिय केल्या आहेत.
  2. राष्ट्रीय संपर्क केंद्र सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी केंद्रीय हेल्पलाईन म्हणून सेवा देईल. रोज सकाळी 8.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत 1800-11-1950 या टोल-फ्री क्रमांकाच्या माध्यमातून ती उपलब्ध असेल. नागरिकांना त्यांच्या प्रश्नांमध्ये सहाय्य करणाऱ्या प्रशिक्षित अधिकाऱ्यांद्वारे दूरध्वनीला उत्तर दिले जाईल.  
  3. वेळेवर आणि स्थानिक पातळीवर प्रतिसाद मिळावा यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेश आणि जिल्ह्याला अनुक्रमे स्वतःचे राज्य संपर्क केंद्र आणि जिल्हा संपर्क केंद्र स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही केंद्रे वर्षभर कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत कार्यरत राहून प्रादेशिक भाषांमध्ये मदत करतात.
  4. सर्व तक्रारी आणि शंका राष्ट्रीय तक्रार सेवा पोर्टलद्वारे नोंदवल्या जातात आणि त्यांचा मागोवा घेतला जातो.
  5. याव्यतिरिक्त केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘बुक-अ-कॉल विथ बीएलओ’ सुविधा सुरू केली असून याद्वारे ‘ईसीआयनेट- प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या वैशिष्ट्याद्वारे, नागरिक आपापल्या बूथस्तरीय अधिकाऱ्याशी थेट संपर्क साधू शकतात.
  6. नागरिक ईसीआयनेट अॅप वापरून निवडणूक अधिकाऱ्यांशीदेखील संपर्क साधू शकतात. आयोगाने सर्व मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी यांना  नियमितपणे प्रगतीचे निरीक्षण करण्याचे आणि वापरकर्त्यांच्या विनंतीचे 48 तासांच्या आत निराकरण करण्याचे निर्देश दिले आहेत.
  7. निवडणुकीशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विद्यमान यंत्रणेव्यतिरिक्त नागरिक complaints@eci.gov.in वर ईमेलदेखील पाठवू शकतात.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content