Homeमुंबई स्पेशलमुंबई महापालिका मुख्यालय...

मुंबई महापालिका मुख्यालय झाले ‘गुलाबी’!

सोमवारी सत्ताधाऱ्यांच्या ‘महाराष्ट्र बंद’ने त्रासल्यानंतर मुंबईकरांना छत्रपती शिवाजी टर्मिनसवर सुखद आनंद घेण्याची संधी मिळाली. तेथील महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत गुलाबी झाली होती. या गुलाबी प्रकाशात न्हाऊन निघालेल्या इमारतीच्या समोर उभे राहून कित्येक शौकिनांनी आपले फोटो काढून घेण्याची हौस फिटवली.

आंतरराष्ट्रीय बालिका दिवस (International Day of the Girl Child) निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाची इमारत काल (दिनांक ११ ऑक्टोबर २०२१) गुलाबी रंगाच्या विद्युत झोतात उजळून निघाली.

सन २०११पासून दरवर्षी ११ ऑक्टोबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे. जगभरातील बालिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत जनजागृती व्हावी, तसेच बालिकांना त्यांचे अधिकार मिळावेत, या हेतूने दरवर्षी ११ ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर बालिका दिवस साजरा व्हावा, यासाठी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये कॅनडा, या देशाने नेतृत्त्व केले होते.

या पार्श्वभूमीवर, कॅनडाचे मुंबईतील राजदूत केथ कॅन यांनी पालिका प्रशासनाला पत्र लिहून, ११ ऑक्टोबर २०२१ रोजी पालिका मुख्यालयाची इमारत गुलाबी रंगाच्या विद्युत रोषणाईने उजळावी, अशी विनंती केली होती. या विनंतीचा मान राखत तसेच बालिकांच्या हक्क, अधिकारांविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने पालिकेने आपल्या मुख्यालयाची इमारत गुलाबी रंगातील विद्युत दिव्यांच्या रोषणाईने उजळून काढली.

यंदाच्या (२०२१) आंतरराष्ट्रीय बालिका दिवसाचे घोषवाक्य ‘डिजीटल जनरेशन, अवर जनरेशन’ असे आहे. आधुनिक युगात, मुलांइतकाच मुलींनाही अद्ययावत तंत्रज्ञानाचा तसेच साधनांच्या वापराचा अधिकार मिळावा, हा या घोषवाक्यामागील जनजागृतीपर उद्देश आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content