Homeटॉप स्टोरी118 कोटींचा बोगस...

118 कोटींचा बोगस जीएसटी परतावा मागणाऱ्या संतोष दोशीला अटक!

बनावट बिलांच्या (इन्व्हॉइस) आधारे 118 कोटींचा परतावा मागणाऱ्या संतोष दोशी नावाच्या एका सराईत आरोपीला वस्तू आणि सेवाकर (जीएसटी)  गुप्तवार्ता महासंचालनालय, सीबीआयसी, (डीजीजीआय-एमझेडयू)च्या मुंबई विभागाने नुकतीच अटक केली.

या अटकेमुळे वस्तू आणि सेवाकर (जीएसटी)  गुप्तवार्ता महासंचालनालय, सीबीआयसी, (डीजीजीआय-एमझेडयू)च्या मुंबई विभागाने इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) परतावा फसवणुकीचे एक मोठे प्रकरण उघडकीला आणले आहे. संतोष दोशी अमल ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेड, सी-क्लस्टर एक्स्पोट्रेड प्रा. लि., एकॉन क्रिस्टल मर्चंट्स प्रा. लि., मेटीक्युलस ओव्हरसीज प्रा. लि., निनाद ओव्हरसीज प्रा. लि., परीस ओव्हरसीज प्रा. लि.,  व्हाईट ओपल एक्स्पोट्रेड प्रा. लि. या 7 कंपन्या नियंत्रित आणि परिचालन करत होता. कोणत्याही प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा पुरवठा न करता बनावट इन्व्हॉइसच्या जोरावर फसवून त्याने इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवले आणि निर्यातीवरील परतावा म्हणून 118 कोटी रुपयांचा दावा केला होता.

या आर्थिक फसवणुकीची पद्धत अशी होती- आरोपी दोशी याने बनावट कागदपत्रांच्या आधारे झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये अनेक डमी युनिट्स तयार केली. नंतर छत्तीसगडमध्ये मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या अनेक शेल कंपन्यांना बनावट आयटीसी दिला. महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई येथे निर्यात करण्यासाठी अनेक युनिट्स तयार केले. त्यांना छत्तीसगडमधील कारखान्यांनी निर्यात करण्यासाठी कथित बनावट माल पाठवला. निर्यात युनिट्स केवळ फसव्या पद्धतीने परतावा मिळवण्याच्या हेतूने तयार करण्यात आली होती.

ही माहिती मिळताच आर्थिक फसवणुकीच्या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला पकडण्यासाठी, जीएसटी गुप्तवार्ता महासंचालनालय, मुंबईने संबंधित सीएचए, सीए, सीएस, प्रमुख व्यक्ती आणि मालवाहतूक फॉरवर्डर्स यांचा शोध घेतला. अनेक जबाब नोंदवले. तपासात हे उघड झाले की, महाराष्ट्रात पुण्यातला रहिवासी संतोष दोशी (जो मे. मासुमी ओव्हरसीज प्रा. लि.चा व्यवस्थापकीय संचालक आहे) प्रत्यक्षात या 7 निर्यातदार कंपन्यांचा प्रवर्तक आणि ऑपरेटर होता. त्याने आयटीसी रोख स्वरूपात मिळवण्यासाठी उत्पादकांपासून व्यापाऱ्यांपर्यंत आणि निर्यातदारांपर्यंत विविध व्यवहारांचा खेळ करून एक जाळे तयार केले.

संतोष दोशीला 17 ऑगस्ट 2021 रोजी अटक करण्यात आली. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याला 2016मध्येही मुंबई सीमाशुल्क विभागाने त्याला अटक केली होती. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Continue reading

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...

रणवीरने पहिल्याच दिवशी पछाडले शाहरुख खानला!

19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंदर 2 : द रिव्हेंज'ने बॉलीवूडच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले. पहिल्याच दिवशी तब्बल ₹ 102.55 कोटी नेट कलेक्शन आणि जागतिक पातळीवर ₹ 200 कोटींचा आकडा पार करत हा चित्रपट बॉलीवूडचा सर्वकालीन सर्वात मोठा ओपनर...

क्रिकेटच्या या हंगामात दोन-तीन हजार रन्स करायचेत!

१३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेटच्या दुनियेतील सर्वात चर्चेतील चेहरा आहे. आयपीएल २०२६च्या आधी एका पत्रकाराने त्याला विचारलं की, "या हंगामात किती धावा करायच्या आहेत?" यावर वैभवने अगदी शांतपणे, निरागस उत्तर दिलं, "दोन-तीन हजार!" संपूर्ण पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला....
Skip to content