Homeचिट चॅटबीएनपी पारिबसच्या कर्मचाऱ्यांनी...

बीएनपी पारिबसच्या कर्मचाऱ्यांनी केले ३२ हजार किलो धान्याचे वाटप

बीएनपी पारिबस कंपनीने ‘दान २०२३’ हा त्यांचा वार्षिक कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी उपक्रम (सीएसआर) यशस्वीपणे पार पाडला आहे. यावर्षी बीएनपी पारिबसच्या कर्मचाऱ्यांनी डाळतांदूळ आणि पीठ मिळून एकत्रितपणे ३२ हजार किलो धान्याचे समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटाला दान करत त्यांच्या घरात सणांचा आनंद फुलवला. हा उपक्रम देशाच्या तीन भागात मुंबईचेन्नई आणि बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आला होता.

भारतात कायमच भुकेची समस्या चिंताजनक बाब राहिली आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स २०२३नुसार भारत अशा १२५ देशांमध्ये १११व्या स्थानावर असून गेल्या काही काळात त्यात किंचित सुधारणा झाली आहे. या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करणे आवश्यक असून दान उत्सवसारखे उपक्रम भुकेविरोधातील भारताच्या लढाईत सकारात्मक योगदान देतील.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून बीएनपी पारिबसने वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांशी (एनजीओ) करार केला असून त्यात असीमा (महाराष्ट्र), आधार (महाराष्ट्र) बीजे होम्स (महाराष्ट्र) प्रेमा वासम (चेन्नई) रॉबिनहूड आर्मी, समर्थानम (कर्नाटक) आणि अध्वम उल्लंगल (तमिळनाडू) यांचा समावेश आहे. या संस्थांच्या मदतीने दान करण्यात आलेल्या अन्नाचे प्रभावी वितरण आणि वापर होईल याची काळजी घेण्यात आली. या संस्था तळागाळातील समाजापर्यंत पोहोचण्याच्या आपल्या कौशल्याच्या मदतीने वंचित घरांतील मुले व प्रौढांच्या पोषणविषयक गरजा पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. १२९०० किलो तांदूळ, १३६०० किलो पीठ आणि ५३०० किलोपेक्षा जास्त डाळीचे या उपक्रमाअंतर्गत वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, बीएनपी पारिबसच्या कर्मचाऱ्यांनी धान्याचे प्रभावी वाटप करण्यात प्रत्यक्षातही सक्रिय मदत केली.

कर्मचाऱ्यांचा सहभाग आणि एनजीओ भागिदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करत बीएनपी पारिबसच्या सीएसआरब्रँड आणि कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख मनिषा खोसला म्हणाल्या की, ‘दान उत्सव’च्या आणखी एका आवृत्तीची यशस्वी सांगता करताना कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सक्रिय योगदानाबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्यांच्या सहभागाशिवाय हा उपक्रम अपूर्ण आहे. त्यांच्या दातृत्वामुळे सणांचा हा काळ आणखी प्रकाशमान झाला, शिवाय समाजाच्या कल्याणाची सर्वांवर असलेली एकत्रित जबाबदारी यानिमित्ताने अधोरेखित झाली.

त्याशिवाय गोळा करण्यात आलेल्या धान्याचे प्रभावी वाटप करणाऱ्या आमच्या प्रतिष्ठित एनजीओचेही मी आभार मानते. एकत्रितपणे आम्ही सकारात्मक आणि दीर्घकाळ टिकणारा बदल घडवून आणू आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी खऱ्या अर्थाने पार पाडू अशी मला खात्री वाटते. बीएनपी पारिबस विविध स्त्रोतांचा वापर करत गरजूंच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम घडवून आणण्यासाठी बांधील आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांतून कंपनीने समाजात भरीव बदल घडवून आणण्याप्रती आपला निश्चय दाखवून दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content