Homeडेली पल्सकाळा पैशांचा सर्वात...

काळा पैशांचा सर्वात मोठा दलाल कलानगरमध्ये!

भारतीय रिझर्व बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून लीलावती हॉस्पिटलमधले किती डॉक्टर, किती वेळा मातोश्रीमध्ये ब्लडप्रेशर तपासायला गेले होते, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला. काळा पैशांचा सर्वात मोठा दलाल कलानगरमध्येच बसला आहे. त्यांच्या कर्जत फार्महाऊसच्या जमिनीखाली दोन हजारांच्या किती नोटा दडवल्या गेल्या आहेत याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

काल बीडमध्ये उबाठा सेनेची महाप्रबोधन यात्रा झाली. ही यात्रा उबाठा सेनेची होती की राष्ट्रवादीची, हेच समजले नाही. संध्याकाळची पाचची वेळ दिली होती. रात्री आठ वाजता सभा सुरू झाली. कार्यकर्ते फिरकले नाहीत. खुर्च्या रिकाम्या होत्या. स्थानिक आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना किती वेळा फोन केले गेले, याचा थांगपत्ता नाही. स्वतःला जागतिक नेते समजणारे दोन प्रवक्ते सभेला साधी गर्दीही जमवू शकत नाहीत आणि हेच नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करतात. पूर्वी बाळासाहेबांच्या सभेत सुधीर जोशी, लीलाधर डाके, प्रमोद नवलकर अशा तोफा होत्या. तेव्हा खऱ्या अर्थाने प्रबोधन होत होते. आता सोफा, एसीची वसुली करणारे, बाळासाहेबांना म्हातारा म्हणणारे, आदित्य ठाकरेंना पेंग्विन म्हणणारे, मुलाला संपवून टाकू असे बोलणारे वक्ते भाषण करताहेत, असे ते म्हणाले.

हे संजय राजाराम राऊत कालच्या भाषणाच्या वेळेला किती शुद्धीत होते हे त्यांनाच माहीत. दोन नाईन्टी घेतल्याशिवाय हा माणूस बोलत नाही. भाषणाआधी यांची अल्कोहोल टेस्ट केली की सगळं काही स्पष्ट होईल. जो माणूस शुद्धीत भाषण करू शकत नाही, वसुलीशिवाय सभा घेऊ शकत नाही आणि पंतप्रधानांवर टीका करतो… अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ब्रिटनचे पंतप्रधान ज्यांना मानसन्मान देतात, जागतिक स्तरावर ज्यांची कीर्ती आहे, त्यांच्यावर टीका करताना यांना काही वाटत नाही. तुमच्या मालकाला साधे कलानगरमध्ये कोण ओळखत नाही. फुकट्यासारखे आयुष्य जगणारे, स्वतःच्या पैशाने साधे परफ्युम मारत नाही. पंतप्रधानांवर टीका करण्याची तुमची हिम्मत कशी होते, असा सवाल राणे यांनी केला.

कर्जतला जे फार्महाऊस आहे त्याची जमीन जेसीबीने खोदा. देशातल्या दोन हजार नोटांमधल्या अर्ध्या नोटा तिथे सापडतील. सुशांत सिंगच्या हत्त्येनंतर एका टीव्हीचा पत्रकार फार्महाऊसपर्यंत पोहोचला होता. परंतु त्याला नंतर अटक झाली. महाविकास आघाडीच्या काळात, पंचवीस वर्षे महापालिका लुटली त्या काळातले पैसे, सगळे तिथेच दडलेले आहेत. आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी रेटकार्ड निघाले आहे. युवा सेनेतून तिकीट पाहिजे असेल तर दोन कोटींचा रेट चालू आहे. ज्याने घाम गाळला, ज्यांनी निष्ठा दाखवली, त्यांना मानसन्मान नाही. त्यांना तिकीट नाही. उद्धव ठाकरेंनी जी प्रथा सुरू केली तीच प्रथा त्यांचा मुलगा आता युवा सेनेत राबवतोय, असेही ते म्हणाले.

मातोश्रीचा पोपट मेलेला आहे. हे सरकार टिकलेले आहे. हे जितके लवकर पचवाल तितकी तुमची तब्येत चांगली राहील. शिंदे सरकार 2024पर्यंत राहणार आणि नंतरही आम्हीच सत्तेत येणार. त्यामुळे कितीही बोंबलला तरी काहीही होणार नाही, हे लक्षात ठेवा असे त्यांनी सांगितले.

कर्जतच्या फार्महाऊसची चौकशी केली तर समजेल की मराठी माणसाला लुटून यांनी कुठे पैसा पुरून ठेवला ते… आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी आपापले एजंट नेमले आहेत. भाचा, मेव्हणा, सगळ्या माध्यमातून कामे होतात. वैभव चेंबर्समध्ये डिलिंग होतात. तुमचे मालक सर्वात जास्त 420 आहेत, हे संजय राजाराम राऊत यांना माहित नाही का? नालेसफाईपासून रस्त्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत यांनी पैसा खाल्ला. आता पारदर्शकपणे काम होत आहे. त्यामुळे घेतलेले पैसे परत द्यावे लागतील या भीतीने, मासे जसे पाण्याशिवाय तडफडतात तशी आता यांची फडफड चालू आहे, असेही नितेश राणे म्हणाले.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content