Homeमुंबई स्पेशलमुंबईत विशिष्ट ठिकाणी...

मुंबईत विशिष्ट ठिकाणी फुगे, पतंग उडवण्यास 21 ऑक्टोबरपर्यंत बंदी

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, जुहू एरोड्रोम, नौदल हवाई स्टेशन आयएनएस शिक्राच्या आसपासच्या मुक्त उड्डाणक्षेत्रात विमानाच्या दिशेने व धावपट्ट्यांच्या दृष्टिकोन मार्गात फुगे, उंच उडणारे फटाके, प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या वस्तू, पतंग आदींना 21 ऑक्टोबरपर्यंत बंदी असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी दिली आहे.

कोणत्याही विमानाच्या लॅंडिंग, टेक ऑफ आणि आवागमनामध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशाने अशाप्रकारच्या वस्तूंचा वापर केल्याचे लक्षात येताच नागरिकांनी पोलीसठाण्यास माहिती देण्याचे आवाहन त्यांनी एका परिपत्रकाद्वारे केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

पॅराग्लाईडर्स, पॅरामोटर्स, मायक्रोलाईट एअरक्राफ्टना 16 सप्टेंबरपर्यंत बंदी

राष्ट्रीय हिताला बाधा पोहोचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील असे घटक जसे पॅराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, ड्रोन, पॅरामोटर्स, हँण्ड ग्लायडर्स, हॉट एअर बलूनच्या उड्डाणक्रियांना बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 16 सप्टेंबर 2023पर्यंत बंदी असल्याची माहितीही पोलीस उपायुक्त ठाकूर यांनी दिली आहे.

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, सामान्य जनतेला धोका उत्पन्न होणार नाही, अति महत्त्वाच्या व्यक्तींना धोका निर्माण होणार नाही, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये याकरीता हे बंदीचे आदेश लागू आहेत. तथापि, ज्यांनी या कालावधीत पूर्व लेखी परवानगी घेतली आहे, अशांसाठी हा आदेश शिथिल असेल. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी एका परिपत्रकात म्हटले आहे.

Continue reading

ट्विटने युद्ध थांबवता येत नाही! इराणने ट्रम्पना सुनावले!!

युद्ध सुरू करणे सोपे आहे. ट्विटने ते थांबवता येत नाही. अमेरिकेला याची किंमत मोजावीच लागेल, अशा शब्दांत इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काल रात्री सुनावले. कालच इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह मोजतबा खामेनेई...

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी...
Skip to content